पुणे

डेंगी, मलेरिया प्रतिबंधासाठी महापालिका मुख्यालय विशेष तपासणी

CD

पिंपरी, ता. १८ : पावसाळ्यात डेंगी व मलेरियाचा वाढता धोका लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाने मुख्यालय परिसरात विशेष तपासणी मोहीम राबविली. मुख्य इमारत, वाहनतळ, कूलर, शोभेच्या झाडांच्या कुंड्या, पाण्याच्या टाक्या तसेच पाणी साचण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली.
महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम पार पडली. तपासणीदरम्यान कूलरमधील पाणी, कुंड्यांखालील ट्रे, वापरात नसलेली भांडी आणि कार्यालयीन परिसरात पाणी साचले आहे का, याची तपासणी करण्यात आली. ज्या ठिकाणी पाणी आढळले ते तत्काळ हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
डासांची उत्पत्तीस्थळे वेळीच नष्ट करणे हा डेंगी-मलेरिया प्रतिबंधाचा सर्वात प्रभावी उपाय असल्याचे सांगत नागरिकांनी घर, कार्यालय आणि परिसरात पाणी साचू न देण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Death Penalty: फाशी नको, इंजेक्शन देऊन मृत्यू द्या! जनहित याचिकेतून मागणी, सुप्रीम कोर्टाने घेतला मोठा निर्णय

IND vs SL 1st Test: श्रीलंकेने डाव टाकला! १४ शतकं झळकावणाऱ्या खेळाडूची अचानक एन्ट्री; रेफरीने दिली परवानगी, नेमकी गडबड काय?

Third Mumbai: १२४ गावात उभं राहणार नवं शहर, सिंगापूरच्या धर्तीवर उभारणार मुंबई ३.०; राज्य सरकारचा मास्टरप्लान

तेव्हा आम्ही खूप तरूण होतो... 'मर्डर' मधल्या बोल्ड सीन्सबद्दल बोलली मल्लिका शेरावत; म्हणते, 'इमरानने मला खूप...

Marathi News Updates : शिवसेना कुणाची? सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

SCROLL FOR NEXT