Devendra Fadanvis esakal
पुणे

Devendra Fadanvis : फडणवीसांनी घेतला पुणे पोलिसांचा क्लास; म्हणाले, ड्रग्जविरोधात मोठी...

बदललेल्या सत्तंतरानंतर पोलिसांना बदल्या आणि भ्रष्टाचाराला समोरे जावे लागणार नाही असेही फडणवीस म्हणाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Devendra Fadanvis : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात पुणे पोलिसांचा चांगलाचा क्लास घेतला. ते पुण्यात बोलत होते.

हे ही वाचा : पुण्याचा पहिला 'माॅल'- तुळशीबाग

यावेळी त्यांनी पोलिसांना कशाप्रकारे काम करणे गरजेचे आहे, याबाबत सूचना केल्या. ते म्हणाले की, आजच्या बैठकीत शहरातील विविध गुन्ह्यांची परिस्थिती काय आहे याचा आढावा घेण्यात आला. २०२२ मध्ये घडलेल्या गुन्ह्यांबाबत यावेळी सखोल चर्चा करण्यात आल्याच ते म्हणाले.

ज्या ठिकाणच्या गुन्हेगारींमध्ये वाढ झाली आहे, त्याची कारण काय आहेत याचादेखील यावेळी मागोवा घेण्यात आला. यावेळी रेट ऑफ कन्व्हिक्शन वाढवण्याबाबत काय उपयायोजना करता येतील यावर चर्चा करण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले.

यावेळी ड्रग्जविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचे फडणवीसांनी यावेळी सांगितले आहे. त्यामुळे येत्या काळात ड्र ग्ज तस्करांविरोधातील कारवाई अधिक कठोर होणार आहे.

फडणवीस म्हणाले की, २०२२ या वर्षात वेगवेगळे गुन्हे आहेत. यात बॉडी ऑफन्ससेस, क्रिमिनल आदींचा आढावा घेण्यात आला. ज्या ठिकाणी गुन्हेगारी वाढली आहे. त्याचा कारणं काय आहेत? याचा आढावा घेण्यात आल्याचे फडणवीसांनी यावेळी सांगितले.

बदललेल्या सत्तंतरानंतर बदल्या आणि भ्रष्टाचार याला समोर जाव लागणार नसल्याचे आश्वासनही फडणवीसांनी पोलिसांना दिले आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या ईमेजला काही दिवसांपूर्वी जो बट्टा लागला होता त्यात हळूहळू बदल होतोय. हा बट्टा पुसून पुन्हा महाराष्ट्र पोलिसांची इमेज आघाडीवर आणण्यासाठी काम करा अशा सूचनाही त्यांनी पोलिसांना दिल्या आहेत.

सध्या राज्यात जातीय, धार्मिक तणाव वाढले आहेत. त्यामुळे ते कमी करण्यासाठी काम करा अशा सूचनाही पोलिसांना दिल्या आहेत. सत्यजीत तांबेंबाबत योग्य वेळी योग्य गोष्टी समजतील असं सूचक विधानही त्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT