पुणे

कऱ्हाड मुख्यमंत्रीफडणवीसयांचासत्कार

CD

कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांचा मुंबईत सत्कार

शेतकऱ्यांच्या वतीने रामकृष्ण वेताळांकडून कार्यक्रमाचे आयोजन

कऱ्हाड, ता. १६ ः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी कर्जमाफी योजना लागू केल्याबद्दल राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाजप किसान मोर्चाच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री अशोक उईके, भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. अनिल बोंडे, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांच्या हस्ते सत्कार झाला.
पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सुमारे ४० हजार कोटी रुपयांच्या कृषी कर्जमाफीची घोषणा केल्याबद्दल मुंबईत हा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘हा सत्कार वैयक्तिक स्वरूपात नव्हे, तर संपूर्ण मंत्रिमंडळाच्या वतीने स्वीकारत आहे. या निमित्ताने राज्यातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली आहे. साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीजपुरवठ्याची योजना यापुढेही कायम ठेवण्यात येईल. यापूर्वीची सुमारे ४८ हजार कोटी रुपयांची थकीत वीजबिले माफ करण्यात येणार आहे. नवीन वीजजोडणी मिळविताना शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नसल्याची शासनाकडून काळजी घेतली जाईल. भविष्यात शेतकऱ्यांना दिवसा बारा तास शेतीसाठी वीज उपलब्ध करून देण्याच्या दिशेने सरकार कार्यरत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कृषिमंत्री भरणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना भविष्यात देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी, अशी भावना व्यक्त केली. प्रदेशाध्यक्ष वेताळ म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली किसान मोर्चा राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सातत्याने कार्यरत राहील. शेतकऱ्यांचे हित हेच सर्वोच्च कर्तव्य आहे. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही कटिबद्धपणे काम करत राहू.’’

W34913
मुंबई ः कर्जमाफीबद्दल देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करताना अशोक उईके, दत्तात्रय भरणे, डॉ. अनिल बोंडे, रवींद्र चव्हाण, रामकृष्ण वेताळ आदी.

..................................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोल्हापूर हादरलं! 'मोक्या'तील गुन्हेगारावर अज्ञातांचा गोळीबार; रिंग रोडवर तणाव, नेमकं काय घडलं?

Double Decker Bus: पुण्यात दिसणार डबल डेकर इलेक्ट्रिक बस! मंगळवारपासून शहरातील 'या' रस्त्यांवर धावणार

Latest Marathi News Live Update : वेस्टर्न एक्सप्रेस-वेवर अपघात, पाच कार अन् एक बसची एकमेकांना धडक, प्रवाशी किरकोळ जखमी

अमेरिकेत महागाईचा भडका! भारतीयांवर मोठी जबाबदारी; रघुराम राजन यांच्यासह या ३ व्यक्ती फेडच्या टास्क फोर्समध्ये

IND vs ENG: दुसऱ्या वनडेपूर्वी भारताला मोठा धक्का! गुरनूर ब्रारवर ICC ची कारवाई; वाचा नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT