पुणे

दुर्गम ढाकगडावर युवकांचे श्रमदान

CD

केडगाव, ता. १३ : कर्जत तालुक्यातील दुर्गम ढाकगड किल्ल्याच्या संवर्धनाचा पाचवा वर्धापनदिन ‘बा रायगड’ परिवारातर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. दोन दिवसीय मोहिमेत आठ मुलींसह ६० युवकांनी श्रमदान करून गडावरील ऐतिहासिक वास्तूंची स्वच्छता केली.
गेल्या पाच वर्षांतील ही ६६वी मोहीम होती. मे महिन्यात होणाऱ्या या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त गडावर संबळ, ढोल-ताशांच्या गजरात भैरवनाथांचा गोंधळ घालण्यात आला. मशाल मिरवणूक, शिवरायांचा जयघोष, वीररसपूर्ण पोवाडे आणि ध्वजारोहणाने गडाचा परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी गडसंवर्धनासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या शिवभक्तांचा विशेष सन्मान करण्यात आला.
सातवाहनकालीन ऐतिहासिक वारसा लाभलेला हा किल्ला दुर्गम वाटांमुळे दुर्लक्षित होता. मात्र, मावळ, पुणे आणि चौफुला (ता. दौंड) येथील युवकांनी एकत्र येत या गडावरील वास्तूंचे जतन करण्याचे आव्हान स्वीकारले आहे. दुर्गम भागातील या वास्तू नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी ही मोहीम राबवली जात असल्याची माहिती संतोष आलम व नितीन गावडे यांनी दिली.

गडावर केलेली कामे
दुर्गम वाटा जिवंत, महाद्वारावर साठलेली माती बाजूला करणे, दिशादर्शक फलक लावणे, टाक्यांमधील माती काढून पाणी स्त्रोत जिवंत करणे, भगवा ध्वज लावणे, दुर्गदिशास्तंभ उभारणे, चौथारे, कोठार, तटबंदी या सर्व वास्तुंजवळ माहिती फलक लावणे, गड देवता काळभैरवनाथाचे मंदिर शोधून तेथे पुजा सुरू करणे, शोधमोहीमा घेऊन काटेरी झाडीने झाकले गेलेले गडावरील शिवलिंग, भैरवनाथ मुर्ती, दीपमाळ अशा वास्तू उजेडात आणल्या. गडावरील वास्तूंची माहिती व नकाशा गडाच्या पायथ्याला लावणे.

१३ किल्ल्यांचे संवर्धन
‘बा रायगड’ परिवार दुर्गम अशा १३ किल्ल्यांचे संवर्धन स्वखर्चातून गेल्या सातवर्षापासून करत आहे. गडावरील शोधमोहिमेत एक ओळीचा शिलालेख सापडला असून, त्यावर अभ्यास चालू आहे.

04350

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sandeep Deshpande : "मराठी सण गुजरात्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ", संदीप देशपांडेंची टीका

Congress Corporator House Firing : नागपूरमध्ये मध्यरात्री थरार! काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर अज्ञात युवकांकडून गोळीबार; घातपाताचा संशय बळावला

Kolhapur-Sindhudurg Road : शिवडाव-सोनवडे घाटमार्गातील अंतिम अडसर दूर; केंद्रीय पर्यावरण समितीची मंजुरी, 13 कोटींचा निधी मंजूर, जाणून घ्या कसा असणार नवा मार्ग

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Nagpur Godhani Chlorine Gas Leak: गोधनीत पुन्हा क्लोरीन गळतीची भीती; जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीवर नागरिकांचे सवाल

SCROLL FOR NEXT