पुणे

देशात प्रथमच पुण्यात सुविधा;कोरोनाचे निदान १५ मिनिटांत

ज्ञानेश सावंत - सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या नव्या रुग्णांना शोधून, त्यांना विलग करण्याबरोबरच तत्काळ उपचार व्हावेत, यासाठी आता ‘स्वॅब’ तपासणीचा अहवाल १५ मिनिटांत मिळणार आहे. ही तपासणी ‘आरटीपीसीआर’चा भाग असून, पूर्वीप्रमाणे २४ तासांऐवजी काही मिनिटांतच तपासणीची प्रक्रिया होणार आहे. ‘कोविड-१९’ मॉलिक्‍युलर असे या चाचणीचे नाव आहे.

कोरोनाची तीव्र लक्षणे असलेल्या मात्र ‘स्वॅब’ तपासणी न झालेल्यांना यामुळे फायदा होणार असून, मृत्युदरही कमी होईल, अशी आशा आहे. देशामध्ये केवळ पुण्यातच ही चाचणी उपलब्ध झाली असून, पाच दिवसांतच प्रत्यक्ष स्वॅब घेण्यास सुरवात होणार आहे. तातडीच्या उपचारासाठी ही तपासणी उपयुक्त ठरेल. ही यंत्रणा तूर्तास ‘क्रस्ना डायग्नॉस्टिक’ने आणली असली तरी पुणेकरांसाठी महापालिका तिचा वापर करणार आहे.  

पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने तपासणीसाठी येणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. त्यात नागरिक ‘अँटिजेन’ ऐवजी प्रयोगशाळेतील ‘आरटीपीसीआर’ तपासणीला प्राधान्य देतात. मात्र, स्वॅब तपासणीचा अहवाल २४ ते ३० तासांनी मिळतो. त्यामुळे उपचारांत अडथळे येत असल्याने रुग्णांची प्रकृती बिघडत असल्याचे दिसून येत आहे. त्याशिवाय, कोरोना नसलेल्या मात्र, अन्य आजारांच्या रुग्णांनाही तपासणीशिवाय उपचार मिळत नसल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे स्वॅब तपासून त्याचा अहवाल कमीतकमी वेळेत देण्यासाठी ही सुविधा आहे. या यंत्रणेच्या वापरासाठी अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासनाची परवानगी मिळाली असून, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या परवानगीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या आठवडाभरात तिचा वापर सुरू होईल, असे ‘क्रस्ना डायग्नॉस्टिक’ने स्पष्ट केले आहे.

१५ मिनिटांत   तपासणीचा अहवाल
स्वॅब टेस्ट (घशातील द्रव पदार्थ) 
तपासणीचे स्वरूप 
----------------------
२०० (पहिला टप्पा) 
दिवसभरात रुग्णांची तपासणी

------------------------
घर, कार्यालयातही सुविधा 
सध्या ‘आरटीपीसीआर’ तपासणीसाठी स्वॅब घेतला जातो. त्यानंतर तो तपासणीसाठी लॅबमध्ये नेण्यात येतो. मात्र, आता स्वॅब घेतल्यानंतर तिथेच त्याची तपासणी करणे शक्‍य आहे. त्यासाठी घर किंवा कार्यालयात यंत्रणा ने-आण करण्याची सोयही उपलब्ध होणार आहे. 

कोरोनाच्या साथीत मृत्युदर कमी करण्याचे आव्हान आहे. त्यासाठी उपाय केले जात आहेत. मात्र, निदान आणि रुग्णांच्या शरीरातील कोरोनाचे प्रमाण लक्षात घेऊन, उपचार प्रक्रिया महत्त्वाची असते. ती या नव्या यंत्रणेतून शक्‍य होईल आणि ही तपासणी अचूक राहणार आहे.  
- डॉ. संजीव वावरे,  सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका 

कोरोनासह अन्य आजारांच्या रुग्णांवरील उपचाराचा वेग वाढविण्यासाठी प्राधान्य देऊन, नव्या यंत्रणेतून नागरिकांचा ‘स्वॅब’ घेतला जाणार आहे. त्यातून १५ मिनिटांत निदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात अशा प्रकारची तपासणी पुण्यातच होईल. 
- पल्लवी जैन,  व्यवस्थापकीय संचालक, क्रस्ना डायग्नॉस्टिक

असे होईल निदान
घशातील किंवा नाकातील द्रव पदार्थाचा नमुना घेतला जातो
संबंधित नमुना ‘आयडी नाऊ’ मशिनमध्ये निदानासाठी ठेवला जातो
रिव्हर्स ट्रान्सफॉर्म पॉलिमर चेन रिॲक्‍शनचा निदानासाठी वापर
अवघ्या काही मिनिटात निदानाचा निष्कर्ष डिस्प्लेवर दिसतो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

Gram Panchayat Delimitation: प्रभागरचनेचे काम, तलाठ्यांना घाम ; ग्रामपंचायतीकडेच सोपवा; संघटनेची महसूल विभागाकडे मागणी

Laxman Hake: ओबीसी आरक्षणासाठी मोठा एल्गार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

15000 Teacher Recruitment : TET ची अट रद्द! राज्यात 15 हजार शिक्षकांची मेगा भरती; 600 क्रीडा शिक्षकांसाठी स्वतंत्र पात्रता निकष जाहीर, ऑनलाईन मागविले अर्ज

SCROLL FOR NEXT