Rajesh-Deshmukh Sakal
पुणे

कुरकुंभ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदासाठी निवडणुकीचे आदेश

कुरकुंभ ग्रामपंचायतीच्या 2018 - 2023 या पंचवार्षिक निवडणुकीत सरपंचपदी राहुल भोसले यांची जनतेतून निवड झाली होती.

सावता नवले

कुरकुंभ - दौंड तालुक्यातील कुरकुंभ ग्रामपंचायतीच्या 2018 मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीचा खर्च वेळेत व विहित नमुन्यात न दिल्याने जनतेतून निवड झालेले सरपंच राहुल भोसले व उपसरपंच विनोद शितोळे यांना विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरविल्यानंतर जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी शुक्रवारी (ता. 3) सरपंच व उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात संबंधित पदाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली असून न्यायालयाचा याबाबतचा निर्णय निवडी अगोदर का नंतर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कुरकुंभ ग्रामपंचायतीच्या 2018 - 2023 या पंचवार्षिक निवडणुकीत सरपंचपदी राहुल भोसले यांची जनतेतून निवड झाली होती. तर त्यांच्या पॅनेलचे 13 पैकी 11 सदस्य निवडून आले होते. त्यामध्ये अपात्र ठरविलेले उपसरपंच विनोद शितोळे यांचाही समावेश होता. निवडणूक खर्च वेळेत व विहित नमुन्यात सादर न केल्याने सरपंच राहुल भोसले यांना अपात्र ठरवावे अशी तक्रार संदीप भागवत व उपसरपंच विनोद शितोळे यांच्याविरुद्ध संदीप साळुंके यांनी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी ही तक्रार फेटाळून लावल्यानंतर भागवत व साळुंके यांनी विभागीय आयुक्तांकडे अपिल केले होते.

आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णय रद्द करून सरपंच व उपसरपंच यांना अपात्र ठरवण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयामुळे गेल्या महिन्यापासून प्रशासक कुरकुंभ ग्रामपंचायतीचा कारभार पाहात आहे. अपात्रतेमुळे रिक्त झालेल्या सरपंच व उपसरपंच पदासाठी शुक्रवार 3 डिसेंबर 2021 रोजी निवडणूक घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले आहेत. त्यामुळे सरपंच व उपसरपंचपदी राहुल भोसले गटाच्या कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायतीत भोसले गटाचे सध्या दहा सदस्य असून विरोधी गटाचे दोन सदस्य आहेत.

विभागीय आयुक्तांनी दिलेल्या अपात्रतेच्या निर्णयाविरोधात राहुल भोसले व विनोद शितोळे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेचे आदेश दिल्याने उच्च न्यायालय या निवडी अगोदर किंवा निवडीनंतर नंतर कोणता निर्णय देणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे ‘द्रुतगती महामार्गा’वर गॅस टँकर उलटला!, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

WPL 2026: जेमिमाहची दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा फायनलमध्ये, गुजरातचा केला पराभव; जेतेपदासाठी RCB शी लढणार

Mumbai Airport incident : मुंबई एअरपोर्टवर भीषण विमान दुर्घटना टळली! ; एअर इंडिया अन् इंडिगो विमानांची पंख एकमेकांना धडकली

मोठी बातमी! ‘टीईटी’त साडेचार लाखातील चार लाख भावी शिक्षक नापास; मराठीचा १२ टक्के तर इंग्रजीचा निकाल ५.४४ टक्के, ३६ जणांचा निकाल ठेवला राखून, वाचा...

Pune Traffic : जेधे चौकात जीव धोक्यात! अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांची रोजची कसरत

SCROLL FOR NEXT