sagar mokashi sakal
पुणे

जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सागर मोकाशी यांनी बांधले शिवबंधन

आमदार संजय जगताप यांना मोठा धक्का

सकाळ डिजिटल टीम

गराडे : पुरंदर तालुका युवक कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष व जिल्हा युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सागर मोकाशी यांनी कॉंग्रेसला सोडचिट्ठी देत शिवसेनेत प्रवेश करीत बांधले शिवबंधन बांधले. नरीमन पॉईंट ( मुंबई ) येथील कार्यालयात माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी हवेली तालुका शिवसेनेचे नेते शंकरराव हरपळे, तालुकाप्रमुख संदीप मोडक, पुरंदर तालुका युवासेनेचे अध्यक्ष मंदार गिरमे, हवेली पंचायत समितीचे सदस्य राजीव भाडळे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव सायकर, महिला आघाडीच्या संघटक सविता ढवळे, सुरज जगताप, राजाभाऊ होले, महेश हरपळे, सोमनाथ कऱ्हे, आदी यावेळी उपस्थित होते.

सागर मोकाशी हे आमदार संजय जगताप यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यांच्या प्रवेशाने आमदार जगताप यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. पुरंदर तालुक्यात युवक कॉंग्रेसच्या उभारणीत मोकाशी यांचे योगदान मोठे मानले जाते. पक्षातील नाराजी वाढल्यामुळे प्रवेश झाला असावा. यापुर्वी युवक कॉंग्रेसच्या तरुण तडफदार सुरज जगताप यांनी पक्षाला रामराम ठोकुन शिवसेनेत प्रवेश केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचं ठरलं! मुंबईत नव्हे अंतरवालीतच!! निर्णय का बदलला? अचानक मुंबईत जाण्याची शक्यता

Mumbai News : झेडपीच्या प्रश्नांवर तोडगा; आरोग्य केंद्र आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Marathi News Live Updates : पारोळ्यात रेशनचा माल काळ्याबाजारात विक्रीचा प्रयत्न फसला

Hiwarkhed Accident : पत्रकार किशोर खडे यांचा अपघातात मृत्यू; हिवरखेड-सोनाळा मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक

Pune Crime: पुणं हादरलं! डोक्यात हातोडा घालून मित्रांनी काढला मित्राचा काटा; विरोधी पार्टीचं स्टेटस ठेवल्याचा राग

SCROLL FOR NEXT