पुणे

पैसे स्वीकारून घटस्फोट नाकारणाऱ्या पत्नीला दणका

CD

पुणे, ता. २२ : परस्पर संमतीने घटस्फोटाचा निर्णय घेऊनही पैसे स्वीकारून माघार घेणाऱ्या पत्नीला कौटुंबिक न्यायालयाने दणका दिला आहे. न्यायाधीश शुभांगी यादव यांनी पतीचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर करत महत्त्वपूर्ण निकाल दिला.

सुरेश आणि सुरेखा (नावे बदललेली) यांचा विवाह २३ फेब्रुवारी २०२३ रोजी झाला होता. मात्र, वैचारिक मतभेदांमुळे ते मार्च २०२४ पासून स्वतंत्र राहत होते. त्यानंतर दोघांनी १३ लाख रुपये आणि दागिने-वस्तूंच्या अटीवर परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पत्नीने सहा लाख ५० हजार रुपये स्वीकारले; परंतु पुढे घटस्फोट देण्यास नकार दिला. यामुळे पतीसमोर कायदेशीर पेच निर्माण झाल्याने त्यांनी वकिलांमार्फत अर्ज दाखल केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत न्यायालयाने पतीचा अर्ज मंजूर केला. तसेच, पत्नीला साडेसहा लाख रुपयांची रक्कम स्वीकारण्याचे आणि लग्नात दिलेले साहित्य स्वखर्चाने नेण्याचे निर्देश दिले.
याबाबत पतीच्या वकील ॲड. श्रुती देशपांडे म्हणाल्या, ‘‘परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याबाबत झालेली तडजोड, त्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती या पार्श्वभूमीवर न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायालयाने घटस्फोटाचा अर्ज मंजूर करण्याबरोबरच आर्थिक तडजोडीशी संबंधित निर्देशही दिले.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HARRY BROOK DOUBLE CENTURY: हॅरी ब्रूकचा वनडेत ऐतिहासिक धमाका! ११४ चेंडूंत द्विशतक ठोकत शुभमन गिलचा विक्रम मोडला, इंग्लंडसाठीही रचला इतिहास

ED Raid : पुण्यासह मुंबईतील ५६७ कोटींची मालमत्ता ‘ईडी’कडून जप्त; ‘पीएसीएल’ गैरव्यवहारप्रकरणी प्रतीक कुमारसह कंपन्यांविरोधात कारवाई

Latest Marathi News Live Update : पहिल्या टी-२० सामन्यात भारताकडून न्यूझीलंड गारद

अखेर बाप- लेकीची भेट होणार! कमळीला राजनच आपले वडील असल्याचं सत्य समजणार; 'कमळी' मध्ये मोठा ट्विस्ट, कामिनी तोंडावर पडणार

Katraj Dairy Milk Rate : कात्रज डेअरीकडून दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयाची वाढ

SCROLL FOR NEXT