पुणे

राहुरीत डीजेवर कारवाई, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

CD

राहुरीत डीजेवर कारवाई

सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

राहुरी, ता. २८ : राहुरी फॅक्टरी येथे मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत कर्णकर्कश आवाजात डीजे वाजविल्याप्रकरणी राहुरी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. डीजे जप्त करून, डीजे मालक व आयोजकांवर सहा जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आसिफ नईम शेख, अख्तर लाला शेख, इम्रान अन्सार सय्यद, सलमान मसीअल खान, सर्फराज तैनुरअली पठाण (सर्वजण रा. प्रसादनगर, राहुरी फॅक्टरी), तसेच डीजे मालक महेश दत्तात्रेय कोबरणे (रा. गणेगाव) आरोपींची नावे आहेत.

राहुरी फॅक्टरी येथे बुधवारी (ता. २६) सकाळी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या आवाजात डीजे वाजविण्यात येत होता. पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आडागळे, पोलिस हवालदार प्रवीण बागूल, बाबासाहेब शेळके, अमोल भांड यांच्यासह पोलिस पथक बंदोबस्तासाठी तैनात होते. आयोजकांना पोलिसांनी वेळोवेळी डीजे बंद करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून डीजे सुरूच ठेवला. त्यानंतर पोलिस पथकाने डीजे जप्त करून ताब्यात घेतला. पोलिस नाईक अमोल परशुराम भांड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------------

Mumbai Local: दरवाजात उभं राहण्यावरुन वाद, रागात तरुणाला धावत्या लोकलमधून खाली ढकललं; बोरीवली स्थानकात थरार

नेपाळमध्ये पूरस्थिती गंभीर; भारतीयांसाठी 24×7 हेल्पलाइन जारी, हे नंबर सेव्ह करा!

True Friendship: संकटात रक्ताची नाती दुरावली, पण मित्र धावून आले; सचिनच्या कुटुंबासाठी जमवले ६ लाख ७२ हजार, रक्ताच्या नात्यालाही लाजवेल अशी मैत्री

Marathi News Live Updates : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात विविध शाळा आणि संस्थांमधील विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन साजरे केले

४३ वर्षांनंतर ‘मासूम’ची नवी कहाणी; ए. आर. रहमान यांनी रेकॉर्ड केली 3 गाणी

SCROLL FOR NEXT