pune sakal
पुणे

पारंपारिक अन्नधान्य पाककृतींमधून लुप्त होवू नयेत : शेफ मनजीतसिंग गिल

पाककृतीमध्ये पौष्टीक, पारंपरिक व देशी अन्नधान्याचा जाणीवपूर्वक समावेश होण्याची गरज

सकाळ वृत्तसेवा

हडपसर : देशातील पारंपरिक व पौष्टीक अन्नधान्य वेगाने उपेक्षित होऊ लागले आहे. त्याचे संवर्धन आणि विकास करण्यासाठी उत्पादक शेतकऱ्यांबरोबरच अन्नधान्याला वेगवेगळ्या पध्दतीने रूची आणणाऱ्या शेफनेही योगदान दिले पाहिजे. त्यांच्या पाककृतीमध्ये अशा पौष्टीक, पारंपरिक व देशी अन्नधान्याचा जाणीवपूर्वक समावेश होण्याची गरज इंडियन फेडरेशन ऑफ कूलिनरी असोसिएशनचे अध्यक्ष व प्रसिद्ध शेफ मनजीतसिंग गिल यांनी व्यक्त केली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मांजरी बुद्रुक येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने व्याख्यानमाला सुरू केली आहे. त्यामध्ये प्रसिद्ध शेफ मनजीतसिंग गिल यांनी 'पीक - शेफ - ग्राहक यांचा अनंत संबंध' या विषयावर व्याख्यान दिले, त्यावेळी ते बोलत होते.

शेफ मनजीतसिंग म्हणाले, "योग्य हंगामात योग्य फळे आणि भाज्यांची उपलब्धता जाणून घेण्यासाठी शेफने शेतकरी आणि पीक शास्त्रज्ञांशी संपर्क साधान्याची आवश्यकता आहे.

"लाल भेंडी", "काळा तांदूळ" आणि ‘लाल मका  सारखी पारंपारिक पिके पाककृतींमधून लुप्त होवू नये यासाठी देशात खाद्यपदार्थाचा महोत्सव साजरा केला जावा. पौष्टिकदृष्ट्या संपन्न “राजगिरा” किंवा “अमरंथ” हे आपल्या पाककृतीचा एक भाग असावा. ‘शेतकरी,  संशोधक आणि शेफ जेव्हा सोबत काम करतील तेंव्हाच सुदृढ राष्ट्र निर्मिती शक्य आहे.'

या ऑनलाइन कार्यक्रमामधे देशातील शेफ, कृषिशास्रज्ञ, विद्यार्थी, शेतकरी आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला होता. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. जी. सोमकुंवार, आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या वरिष्ठ शास्रज्ञ डॉ. अनुराधा उपाध्याय यांनी केले तर, डॉ. सुजॉय सहा यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT