rajesh deshmukh sakal
पुणे

काही काळजी करू नका, आम्ही सोबत आहोत

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी साधला संवाद

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसोबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (rajesh deshmukh) यांनी संवाद साधत त्यांची आस्थेने विचारपूस केली. ‘कोणतीही काळजी करू नका. कोणतीही अडचण आल्यास आमच्याशी संपर्क करा, आम्ही कायम आपल्यासोबत आहोत,’ असा दिलासा त्यांनी अनाथ बालकांना दिला.

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारमार्फत आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या सूचनेनुसार भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत २८ बालकांचे बँक खाते उघडण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी प्रत्येक बालकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, भारतीय स्टेट बँकेचे सहायक प्रबंधक कृष्ण वेणी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी परम आनंद यांच्यासह संबंधित यंत्रणेचे प्रमुख अधिकारी या वेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, ‘राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन आपल्यासोबत आहे. कोणतीही काळजी करू नका, कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आमच्याशी संपर्क साधा. आम्ही कायम आपल्यासोबत आहोत. आपल्या सर्व अडचणी सोडविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.’ कोरोनामुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकांपर्यंत पोचून त्यांच्या संगोपनाची आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army Alert: भारतात घुसण्यासाठी 500 दहशवादी रेडी! 'पीओके'मध्ये लपून बसल्याची माहिती; लष्कराकडे महत्त्वाचे इनपुट्स

US Work Permit Rules: ट्रम्प यांचा भारतीयांना मोठा झटका! वर्क परमिट संपल्यावर नोकरी जाणार?

Mumbai: १० वर्षीय मुलीनं १८ महिन्यांच्या बाळाला इमारतीवरून खाली फेकलं, गोरेगावात काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Bank Holiday: 15 ते 31 ऑक्टोबरदरम्यान बँकांना 12 दिवस सुट्ट्या! महाराष्ट्रात कधी बंद राहणार बँका? पाहा संपूर्ण यादी

Latest Marathi News Update : जुन्नर तालुक्यात खरीप पिकांचे पंचनामे आजपासून सुरू

SCROLL FOR NEXT