पुणे

जाहीर

CD

PNE26W18686
अहिल्यानगर ः आदर्श प्राचार्य पुरस्कार दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांना रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य जे. के. जाधव व कुलगुरू ज्ञानदेव म्हस्के यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

आदर्श प्राचार्य पुरस्कार
डॉ. नगरकर यांना प्रदान
अहिल्यानगर, ता. १२ ः रयत शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव, प्राचार्य वसंत रोकडे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘आदर्श प्राचार्य पुरस्कार’ दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांना प्रदान करण्यात आला.
सातारा येथील कार्यक्रमात रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य जे. के. बापू जाधव, तसेच कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ अहिल्यानगरचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, विद्यार्थिकेंद्रित उपक्रम आणि महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केलेल्या योगदानाची दखल घेत हा सन्मान संस्थेतर्फे देण्यात आला. प्राचार्य नगरकर यांनी पुरस्कारातून मिळालेली सर्व रक्कम महाविद्यालयातील गरीब विद्यार्थी फंडास देण्याची घोषणा केली. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.
या पुरस्काराबद्दल रयतचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार रोहित पवार, सदस्य अंबादास पिसाळ, बप्पासाहेब धांडे, राजेंद्र निंबाळकर आदींनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT