Savitribai-Phule-University 
पुणे

सांडपाण्याचा होणार पुनर्वापर

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात असलेल्या सर्व इमारतींमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी लवकरच प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन बारा लाख लिटर असणार आहे. त्यामुळे दररोज लाखो लिटर पाण्याची बचत करणे शक्‍य होणार आहे. हा प्रकल्प राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियानाअंतर्गत उभारण्यात येणार आहे.

विद्यापीठाच्या आवारातील इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी निर्माण होते. या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी हा प्रकल्प असेल. तो एक वर्षात  (३१ ऑक्‍टोबरपूर्वी) पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी मूव्हिंग बेड बायोफिल्म रिॲक्‍टर (एमबीबीआर) हे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी १.८८ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारे पाणी एका मोठ्या टाकीत साठवले जाणार आहे. ते विद्यापीठातील बागांसाठी वापरता येणार आहे. त्यामुळे भूजलाचा वापर बऱ्याच प्रमाणात कमी करता येणार आहे. यातून पाण्याची बचत होईलच, शिवाय विद्यापीठातील हिरवाईसुद्धा कायम राहणार आहे. या  प्रकल्पाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी एजन्सी नेमण्यात येणार आहे, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

विद्यापीठातील सर्व सांडपाण्यावर या प्रकल्पामुळे प्रक्रिया होऊ शकणार आहे. त्याद्वारे विद्यापीठाचे आवार अधिक पर्यावरणपूरक बनेल. तसेच उन्हाळ्यात निर्माण होणारी पाण्याची टंचाई दूर करणेही शक्‍य होणार आहे.
- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT