lalit patil Esakal
पुणे

Lalit Patil : विनय अरान्हाच्या व्यवस्थापकाने ललित पाटीलला दिले एटीएम कार्ड

अमली पदार्थांची तस्करी आणि ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आहे आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - अमली पदार्थ तस्कर ललित पाटील हा रुसून रुग्णालयात उपचार घेत असताना भूषण पाटीलने त्याची २९ आणि अभिषेक बलकवडेने ३० सप्टेंबरला भेट घेतली होती. या दोघांनी कट रचून ललित पाटीलला पळविले. ललितला पळून जाण्यासाठी विनय अरान्हाकडे काम करणारा चालक दत्तात्रेय डोके याने गाडी उपलब्ध करून दिली. तर अरान्हाचा व्यवस्थापक अश्र्विन कामत याने ललितला एटीएम कार्ड दिले, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी (ता. २६) न्यायालयास दिली.

ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या तिघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी ३० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ललितचा भाऊ भूषण अनिल पाटील (वय-३४), साथीदार अभिषेक विलास बलकवडे (वय ३१, रा. दोघेही नाशिक) आणि रोझरी स्कूलचा संचालक विनय विवेक अरान्हा (वय ५०) असे पोलिस पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

अमली पदार्थांची तस्करी आणि ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आहे आहेत. भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांना अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यातून ललित पाटील फरार झाल्याच्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले आहे. तर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केलेल्या विनय अरान्हाला बुधवारी तळोजा कारागृहातून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरुवारी तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.

अरान्हा याने कोणत्या कारणांसाठी ललित पाटीलची मदत केली आहे? कोणाच्या सांगण्यावरून ही मदत केली आहे? अटक करण्यात आलेल्या आरोपींनी संगनमत करून कट रचला आहे. हा कट कशाप्रकारे आणि कुठे रचला आहे? याचा तपास करण्यासाठी सरकारी वकील नीलिमा यादव-इथापे यांनी आरोपींना सात दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी केली.

तर आरोपींच्या वकिलांनी पोलिस कोठडीला विरोध केला. अरान्हा याच्यावतीने ॲड. भाग्यश्री सोतूर यांनी बाजू मांडली. अरान्हा न्यायालयीन कोठडीत होते. न्यायालयीन कोठडीत असताना ते चालक आणि व्यवस्थापक यांना ललित पाटीलची मदत करा, हे कसे काय सांगू शकतात?

तसेच ललित पाटील पळून गेल्यानंतरही अरान्हा हे पुढचे चार दिवस ससूनमध्ये होते. त्यावेळी पोलिसांनी चौकशी का केली नाही? असा युक्तिवाद ॲड. सोतूर यांनी केला. भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांच्यावतीने ॲड. संदीप बाली यांनी बाजू मांडली.

व्यवस्थापकाला ताब्यात का घेतले नाही?

अरान्हा याचा व्यवस्थापक कामत याचा या गुन्ह्यात सहभाग दिसून येत असताना त्याला आत्तापर्यंत ताब्यात का घेतले नाही? असा प्रश्न न्यायालयाने तपासी अधिकाऱ्यांना विचारला. त्यावर त्यांनी न्यायालयास सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरु असून ज्यांच्या सहभाग असेल त्यांना ताब्यात घेण्यात येईल.

भूषण पाटीलला भोवळ -

भूषण पाटील याला तोंडावर पट्टी बांधून न्यायालयात न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणी सुरू असताना त्याला भोवळ आली. त्यामुळे तो टेबलावरून खाली पडला. यानंतर त्याला कोर्ट रूमच्या बाहेर नेण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT