Drugs sakal
पुणे

Pune Crime: पुणे लोहमार्ग पोलिसांची मोठी कामगिरी! सव्वासहा कोटींचे अमली पदार्थ नष्ट

पुणे लोहमार्ग पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाईत जप्त केलेला एक हजार किलो गांजा आणि सात किलो ८९६ ग्रॅम चरस नष्ट करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे लोहमार्ग पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाईत जप्त केलेला एक हजार किलो गांजा आणि सात किलो ८९६ ग्रॅम चरस नष्ट करण्यात आला आहे. या अमली पदार्थांची किंमत सहा कोटी २५ लाख रुपये इतकी आहे.

पुणे लोहमार्ग पोलिसांच्या पुणे, दौंड, कुर्डुवाडी आणि सोलापूर येथील पोलिस पथकांनी १९९२ पासून आत्तापर्यंत अमली पदार्थ तस्करांच्या विरोधात कारवाई केली. या ४७ गुन्ह्यांमध्ये दीड हजार किलो गांजा आणि चरस अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. न्यायालयीन प्रक्रियेनंतर २९ गुन्ह्यातील गांजा आणि चरस नष्ट करण्याची परवानगी मिळाली.

त्यानुसार पुणे लोहमार्ग पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपअधीक्षक चंद्रकांत भोसले यांच्या समितीने खडकी मुख्यालयातील अमली पदार्थांचा पंचनामा केला. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी अमली पदार्थ रासायनिक विश्लेषण तज्ज्ञ, प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि वजन- मापे विभागातील अधिकाऱ्यांसमोर अमली पदार्थ भट्टीत जाळून नष्ट करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

गणेशोत्सवात चाकरमान्यांचा कोकणचा प्रवास सुकर! सीएसएमटी-सावंतवाडी रेल्वे सुरु, 'अशी' करा सीट बुक

Strawberry Cultivation : आंबेगाव, खेड, जुन्नर व मावळ तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४.९६ कोटी रुपये निधी मंजूर; विधानसभा माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

SCROLL FOR NEXT