DSK Case Sakal
पुणे

DSK Case : ठेवीदारांचे पैसे परत देण्यासाठी काय केले याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात ठेवीदारांचे पैसे परत मिळण्यासाठी काय कार्यवाही केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात ठेवीदारांचे पैसे परत मिळण्यासाठी काय कार्यवाही केली याची माहिती देणारे सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करावे, असा आदेश उच्च न्यायालयाने या प्रकरणातील सरकारी वकिलांना दिला आहे. उच्च न्यायालयातील न्यायाधीश शर्मिला देशमुख आणि ए. एस. गडकरी यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.

११ ऑक्टोबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे आदेशात नमूद आहे. फसवणूक झालेल्या ठेवीदारांचे पैसे परत मिळत नाही तोपर्यंत डीएसके यांची कोणतीही मालमत्ता जप्तीच्या कारवार्इतून वगळण्यात येवू नये, अशी मागणी करणारी फौजदारी याचिका ठेविदारांच्यावतीने ॲड. चंद्रकांत बिडकर यांनी उच्च न्यायालयात केली आहे.

त्यावर डीएसके यांच्या जप्त व लिलाव केलेल्या मालमत्तेची माहिती सादर करण्याचा आदेश न्यायालयाने पोलिसांना दिला होता. त्यानुसार पोलिसांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. डीएसके यांच्या आत्तापर्यंत ३३५ स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच डीएसके यांच्या विविध कंपन्या व खासगी वापराची ४६ वाहने देखील पोलिसांनी जप्त केली आहेत.

त्यातील १३ वाहनांचा लिलाव केल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने दिलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. दरम्यान ॲड. बिडकर यांनी ठेवीदारांचे पैसे अद्याप मिळाले नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळावे, या मागणीसाठी ठेवीदारांच्यावतीने आत्तापर्यंत विविध अर्ज करण्यात आले आहेत. त्यातील १४ अर्जांवर न्यायालयाचा आदेश देखील झाला आहे. गुंतवलेले पैसे कधी परत मिळतील याची ठेवीदार वाट पाहत आहेत. त्या अनुषंगाने न्यायालयात पाठपुरावा करण्यात येत आहे. ठेवीदारांचे पैसे मिळण्यासाठी आवश्‍यक असलेली प्रक्रीया जलदगतीने होत नसल्याने ठेवीदार वैतागले आहेत.

- ॲड. चंद्रकांत बिडकर, ठेवीदारांचे वकील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Prices India : मध्य पूर्वेतील तणावाचा तेलांच्या किमतीवर परिणाम ! जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर

‘धुरंधर 2’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पण प्रकाश राज यांचा बॉलिवूडवर सवाल, 'हिंदी कलाकार गप्प का?'

Maharashtra News: अवघ्या दोनशे रुपयांत होणार जमिनींचे पोटहिस्से, मोजणी फीमध्ये सवलत; राज्य भूमी अभिलेख विभागाचा निर्णय

Walking Benefits: फक्त 1 किमी चालण्याची सवय लावा! शरीरात होणारे बदल पाहून तुम्हीही चकित व्हाल

अभिनयातून व्यवसायाकडे वळला अभिजित केळकर; ‘प्रत्येक घासात अस्सल चव’ देण्याचा निर्धार

SCROLL FOR NEXT