पुणे

मंचरमध्ये ५९ मंडळांच्या विसर्जन मिरवणुका

CD

मंचर, ता. २२ : मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मंचर, अवसरी खुर्द, आदर्शगाव, गावडेवाडी, पिंपळगाव खडकी, लांडेवाडी, पेठ, पारगाव तर्फे खेड, एकलहरे, सुलतानपूर, शेवाळवाडी, तांबडेमळा, भोरमळा आदी गावांमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित सार्वजनिक दुर्गादेवी मंडळांच्या विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या. एकूण १२० सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांपैकी ५९ मंडळांच्या विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या होत्या.
मंचर शहरातील विसर्जन मिरवणुका विशेष लक्षवेधी ठरल्या. यंदा मिरवणुका गुलालविरहित काढण्यात आल्या. मिरवणुकांच्या अग्रभागी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. डीजे, ढोलपथके तसेच पारंपरिक वाद्यांच्या गजरात भाविकांनी उत्साहात देवीला निरोप दिला.
रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी ध्वनिक्षेपक बंद करण्यात आले. त्यानंतर घोड नदीसह परिसरातील तलाव आणि विहिरींमध्ये सर्व देवींच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. संपूर्ण उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली. तसेच तीन ठिकाणी दुर्गादौड आणि एका ठिकाणी रावणदहनाचा कार्यक्रम शांततेत पार पडला.
मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली विविध चौकांमध्ये तसेच संवेदनशील ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांच्या नियोजनबद्ध बंदोबस्तामुळे सर्व विसर्जन मिरवणुका कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HARRY BROOK DOUBLE CENTURY: हॅरी ब्रूकचा वनडेत ऐतिहासिक धमाका! ११४ चेंडूंत द्विशतक ठोकत शुभमन गिलचा विक्रम मोडला, इंग्लंडसाठीही रचला इतिहास

ED Raid : पुण्यासह मुंबईतील ५६७ कोटींची मालमत्ता ‘ईडी’कडून जप्त; ‘पीएसीएल’ गैरव्यवहारप्रकरणी प्रतीक कुमारसह कंपन्यांविरोधात कारवाई

Latest Marathi News Live Update : पहिल्या टी-२० सामन्यात भारताकडून न्यूझीलंड गारद

अखेर बाप- लेकीची भेट होणार! कमळीला राजनच आपले वडील असल्याचं सत्य समजणार; 'कमळी' मध्ये मोठा ट्विस्ट, कामिनी तोंडावर पडणार

Katraj Dairy Milk Rate : कात्रज डेअरीकडून दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयाची वाढ

SCROLL FOR NEXT