Ajit Pawar Esakal
पुणे

Ajit Pawar: पालकमंत्री अजित पवारांच्या महत्वाच्या बैठकीवेळी भाजप आमदारांची दांडी, राजकीय चर्चांना उधाण

पुण्यात पालकमंत्र्यांच्या महत्वपूर्ण पाण्याच्या बैठकीला भाजप आमदाराची दांडी

अंकिता खाणे (Ankita Khane)

उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री झाल्यापासून आढावा बैठकी घेण्यास सुरूवात केली आहे. आज सकाळी पुण्यात 7 वाजता पुण्यात अजित पवारांनी बैठक सुरू केली. दरम्यान पुण्यात पालकमंत्र्यांच्या पाण्याच्या महत्वपूर्ण बैठकीला भाजप आमदारांनी दांडी मारल्याचं दिसून आलं आहे.

पुण्यात उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज सकाळी कालवा समिती आढाव बैठक पार पडली. कालवा समिती बैठकीला भाजपचा फक्त एकच आमदार उपस्थितीत होता. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर हे अजित पवारांच्या बैठकीला उपस्थितीत राहिले होते.

पुण्यात आठ मतदारसंघापैकी दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तर एक काँग्रेसचा आमदार उपस्थित होता. भाजपच्या पाच आमदारांपैकी एकच आमदार बैठकीला उपस्थितीत असल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, अजित पवार साधारण दर शुक्रवारी आढावा बैठक घेत असतात. सकाळी सात वाजेपासूनच बैठकांचं नियोजन करत असतात.

दरम्यान पालकमंत्री बदल्यामुळे भाजप आमदार नाराज असल्याच्या देखील चर्चा काही दिवसांपुर्वी सुरू होत्या. राष्ट्रवादी (अजित पवार गट) पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही होती, तर भाजप कार्यकर्ते आधीच अजित पवारांना अर्थमंत्री पद दिल्याने नाराज होते, अशातच त्यांना पुण्याचे पालकमंत्री पद दिल्याने ही नाराजी काही नेत्यांनी उघडपणे दाखवली होती. त्यामुळे भाजपच्या आमदारांनी अजित पवारांच्या बैठकीला दांडी मारल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

अधिकारी अन् आमदार येण्याआधीच अजितदादा पोहचले

आज सकाळी पुण्यात 7 वाजल्यापासून बैठका आहे. मात्र या बैठकीसाठी अजित पवार अधिकाऱ्यांच्या अर्धा तास आधीच पोहचले आहे.

त्याचबरोबर नीट काम करा, कामात दुर्लक्ष झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशाही सूचना पालकमंत्री अजित पवारांनी आधिकाऱ्यांना दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Donald Trump Blockade: 'जवळ आलात तर नष्ट करून टाकू'! डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक धमकी; इराणच्या बंदरांवर नाकाबंदी

SRH vs RR : ७ धावांत ४ विकेट्स! Praful Hinge ने इतिहास रचला; वैभव सूर्यवंशीची विकेट मिळताच काव्या मारनचा आनंद पाहा... Video

Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..

RR vs SRH: वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल अन्... विदर्भच्या पोरांनं मैदान गाजवलं; जे भल्याभल्यांना जमलं नाही ते करून दाखवलं

SCROLL FOR NEXT