पुणे

बाणेर-बालेवाडीतील वृक्षसंवर्धनाचा मुद्दा ऐरणीवर;

CD

बालेवाडी, ता. १७ : दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची परंपरा जपताना झाडांच्या फांद्यांची तोड होऊ नये, असे आवाहन पर्यावरणप्रेमींकडून नागरिकांना करण्यात येत आहे. बाणेर-बालेवाडी परिसरात झपाट्याने वाढणारे नागरीकरण, बांधकामे आणि पर्यावरण संवर्धनाचे वाढते महत्त्व लक्षात घेता, सण साजरा करताना वृक्षांचे संरक्षण करण्याची जबाबदारी नागरिकांनीही घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
बाणेर-बालेवाडी परिसरात निवासी सोसायट्या, व्यावसायिक संकुले व रस्ते विकासामुळे नागरी विस्तार वाढत आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध झाडांचे जतन करणे, नव्याने वृक्षलागवड करणे आणि सार्वजनिक परिसरातील हरित क्षेत्र टिकविणे महत्त्वाचे ठरते.
सणाच्या निमित्ताने वृक्षांना हानी पोहोचू न देणे, ही पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांना सहज करता येणारी कृती आहे. सणाची परंपरा जपत झाडांचे संरक्षण करणे आणि वृक्षतोड होत असल्यास प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे, यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपट्याच्या पानांसाठी अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तोडल्या जातात. काहीवेळा आंबा, शमी, कांचन अशा वृक्षांनाही हानी पोहोचते. हे टाळण्याचे जाहीर आवाहन पुणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणानेही केले आहे. परंपरेचे पालन करताना झाडांची हानी होणार नाही, याची काळजी घ्यावी आणि शक्यतो पर्यायी प्रतीकात्मक साहित्याचा वापर करावा, असे आवाहन वसुंधरा अभियानाच्या वतीने पांडुरंग भुजबळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी क्षेत्रातील झाडांचे संरक्षण व जतन अधिनियमानुसार विनापरवाना वृक्षतोड करणे किंवा झाडांना हानी पोहोचविणे हे दंडनीय आहे. त्यामुळे सणाच्या सबबीखाली झाडांच्या फांद्या तोडण्याचे प्रकार आढळल्यास नागरिकांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालय किंवा वृक्ष अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे आवाहन औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गोविंद दांगट यांच्या वतीने करण्यात येत आहे.
अशी करा तक्रार :-
बाणेर-बालेवाडी परिसरात विनापरवाना वृक्षतोड किंवा झाडांच्या फांद्या तोडण्याचा प्रकार आढळल्यास संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील महापालिका सहाय्यक आयुक्त आणि वृक्ष अधिकाऱ्यांकडे तक्रार करता येईल. तसेच पुणे महानगरपालिकेच्या complaints.pmc.gov.in या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवर तक्रार नोंदविण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tiger Shroff shooting incident : टायगरला फोन करून समजावलं होतं, पण...; बिश्नोई गँगनं घेतली हल्ल्याची जबाबदारी

CEC Gyanesh Kumar Row : देशातील संघर्ष आता आंतरराष्ट्रीय स्तरावर! लंडनमधून ध्रुव राठीचा थेट हल्लाबोल, म्हणाला...

Marathwada Graduate Election 2026: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मोठा ट्विस्ट! ४० हून अधिक आजी-माजी आमदार, खासदार मतदानापासून वंचित?

Solapur Politics : ऐन मतदानाच्या तोंडावर शरद पवारांना सर्वात मोठा धक्का; सोलापुरातील ३ आमदारांचा थेट भाजपला पाठिंबा, नेमकं काय घडलं?

Video: टायगर श्रॉफवर गोळीबार; दुचाकीवरून आले तीन हल्लेखोर,धक्कादायक व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT