Ajit Pawar in Namo Rojgar Melava Esakal
पुणे

Ajit Pawar in Namo Rojgar Melava : पूर्वीची बारामती अन् आज.. शरद पवारांच्या समोरच अजित पवारांनी मोजली विकासकामे

Ajit Pawar in Namo Rojgar Melava : बारामती येथे विद्या प्रतिष्ठाणच्या संस्थेत नमो रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे, निलम गोऱ्हे इत्यादी नेते उपस्थित होते.

अंकिता खाणे (Ankita Khane)

बारामती येथे विद्या प्रतिष्ठाणच्या संस्थेत नमो रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे, निलम गोऱ्हे इत्यादी नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी राज्यातील अनेकांना रोजगार मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर यावेळी अजित पवारांनी बारामतीत झालेल्या विकासकामांची यादी वाचून दाखवली आहे.

देशात विदेशात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध आहेत. त्या संधीचं सोनं करायचं आहे. आधीच्या बारामतीत आणि आताच्या बारामतीत मोठा फरक झाला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना अजित पवारांनी बारामतीत झालेल्या बदलांची यादी वाचून दाखवली. आता राज्यातील सर्वांत मोठं बस स्थानक बारामतीत उभारलं आहे. आज करोडो रूपयांची कामे पुर्णत्वाला जात आहेत. बारामतीचा कायापालट झाला आहे, असंही ते म्हणालेत.

अजित पवारांनी यावेळी सांगितलं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उशिर होणार होता. पोलिसांच्या ताफ्यात नवीन 39 गाड्या दाखल झाल्या आहेत. याचा शुभारंभ गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून मी केला. तिथे ३९ वाहनांमध्ये जे ड्रायव्हर होते, त्याच्यात १४ महिला होत्या. सर्वांत चांगलं काम त्यांचं सुरू होतं. महिलांना संधी देण्याचं काम महायुती सरकार करत आहे असंही यावेळी अजित पवार म्हणाले.

आज करोडो कामे बारामतीकरांसाठी करण्यात येत आहेत. अशा प्रकारे टप्याटप्याने पुढे जात राहु. एक दिवस विकासाच्या बाबतीत राज्यात बारामती तालुका एक नंबर असेल असा विश्वास यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Recruitment Fraud: नगर रचनाकार गट-अ भरतीत मोठ्या गैरव्यवहाराचा संशय; बनावट अनुभव प्रमाणपत्रांमुळे पात्र उमेदवारांवर अन्याय

Methi Matar Muthiya: नाश्त्याला बनवा कमी तेलात वाफवून तयार होणारा पारंपारिक गुजराती पदार्थ; मेथी मटार मुठिया!

विशेष: तुमच्यासाठी ‘एआय’ काय काम करतो?

Students Blood Drive: स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अनोखा रक्तदान उपक्रम; १०० हून अधिक जणांचा सहभाग

Pune News : स्पाइसजेटच्या मनमानी कारभाराचा प्रवाशांना फटका; दिल्ली विमानतळावर पुण्यातील प्रवाशांना अपमानास्पद वागणूक

SCROLL FOR NEXT