sakal-exclusive 
पुणे

खासगी रुग्णालयांत अत्यवस्थांवरच उपचार; पुणे महापालिकेचा निर्णय 

ज्ञानेश सावंत - सकाळ वृत्तसेवा

पुणे- महापालिकेने ताब्यात घेतलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये अत्यवस्थ रुग्णांनाच दाखल करून घेतले जाणार आहे. तेथे व्हेंटिलेटर आणि ऑक्‍सिजन बेडची सुविधा असेल. मात्र, रुग्णसंख्या कमी झाल्यास खासगी रूग्णालयांसोबतचे करार रद्द करून महापालिका रुग्णालयांत रुग्णांवर उपचार करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे या खासगी रुग्णालयामध्ये अन्य आजारांच्या रूग्णांवर प्राधान्याने उपचार होतील. 

पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर रुग्णांना बेड उपलब्ध होण्यासाठी 11 खासगी रूग्णालयांसोबत करार केला. तेथे गरीब रुग्णांना म्हणजे शहरी-गरीब योजनेत पात्र ठरलेल्यांना मोफत उपचाराची व्यवस्था केली. त्यातून महापालिकेला पहिल्या टप्प्यांत अकराशेहून अधिक बेड उपलब्ध झाल्या. त्यासाठी या रूग्णालयांसोबत एप्रिलमध्ये सहा महिन्यांचा करार केला; त्यानंतरही रुग्ण वाढत राहिल्याने सप्टेंबरमध्ये हा करार तीन महिन्यांनी वाढविला. परंतु, गेल्या काही दिवसांपासून रुग्णांचा आकडा तीनशेपर्यंत खाली उतरला आहे. त्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयांसह पुणे आणि पिंपरीतील जम्बो, कोविड हॉस्पिटल पुरेसे असल्याने खासगी रुग्णालयांमध्ये केवळ अत्यवस्थ रुग्णांना अर्थात ज्यांना व्हेंटिलेटर आणि ऑक्‍सिजनची गरज आहे, त्यांनाच उपचारासाठी दाखल करून घेण्यात येत आहे, असे महापालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रूग्णसंख्या पाहून करार करणार 
पहिल्या टप्प्यातील सहा महिन्यांचा करार संपल्यानंतर या रूग्णालयांसोबत नव्याने तीन महिन्यांचा करार केला असून, तो डिसेंबरपर्यंत आहेत. मात्र, या काळात म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातच कोरोनाचा दुसरा टप्पा सुरू होईल आणि रुग्णसंख्येत मोठी वाढ होईल, असा अंदाज आहे. त्यानंतर रुग्णसंख्या पाहून खासगी रूग्णालयांसोबत करार केले जातील, असे महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

11  - करार केलेले रुग्णालय 
1,302  -  बेडची संख्या 

सध्या ज्या रुग्णांना श्‍वास घेण्यासाठी त्रास होतो; त्यांनाच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यास प्राधान्य आहे. त्याशिवाय, कोरोनाची तीव्र लक्षणे असलेल्यांनाही दाखल केले जाते. नव्या रुग्णांची संख्या पाहता शहरात पुरेसे बेड उपलब्ध आहेत. करार केलेल्या 11 रुग्णालयांची गरज नव्या वर्षांत भासू शकेल. 
- डॉ. संजीव वावरे,  सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT