पुणे

समाज विकास विभागातर्फे एकल महिला सन्मान दिन

CD

पिंपळे गुरव, ता. २५ ः विधवांचे आर्थिक, सामाजिक सक्षमीकरण व्हावे आणि विविध कल्याणकारी योजनांचा त्यांना थेट लाभ मिळावा, या उद्देशाने पिंपरी चिचवड महानगरपालिका समाज विकास विभागाच्या वतीने ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकल महिला सन्मान दिनानिमित उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाला ‘ह’ क्षेत्रीय अधिकारी सुनंदा बांगर, मंदा गोरे, प्रियांका गिरमे, समूह संघटक वैशाली लगाडे, वंदना रावडे, अंकिता मवाळ, वनिता कांबळे यांच्यासह विविध सामाजिक प्रकल्पांतील महिला सदस्या आणि एकल महिला उपस्थित होत्या.
या प्रसंगी विधवा व एकल महिलांना महानगरपालिका आणि शासन स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. महिलांच्या शासकीय कागदपत्रांमधील अडचणी समजून घेत त्या सोडवण्यासाठी संबंधित सर्व स्तरांवरून पूर्ण मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच ज्या महिला अद्याप महिला बचत गटात समाविष्ट झालेल्या नाहीत. त्यांना बचत गटात सामील होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. एकल महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ, उमेद आणि इतर संबंधित विभागांच्या समन्वयाने स्वयंरोजगार व कौशल्य विकास मार्गदर्शन मेळाव्यांचे आयोजन करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT