पुणे

इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी सात मिनिटांत बदलता येणार

CD

पुणे, ता. १५ ः इलेक्ट्रिक अवजड वाहनांच्या निर्मितीसोबतच त्यांच्या चार्जिंग आणि बॅटरी बदलण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘एनर्जी इन मोशन’ कंपनी देशभरात केंद्रांचे जाळे उभारत आहे. महामार्ग, बंदरे आणि औद्योगिक संकुलांमध्ये उभारण्यात येणाऱ्या या केंद्रांवर कंपनीच्या तसेच सुसंगत अन्य कंपन्यांच्या वाहनांची बॅटरी सात मिनिटांपेक्षा कमी वेळेत बदलता येणार आहे.
‘एनर्जी इन मोशन’ ही स्वतंत्र कंपनी असून नरेंद्र मुरकुंबी हे व्यवस्थापकीय संचालक आहेत. तळेगाव येथील आंबी गावातील कंपनीच्या उत्पादन केंद्राचे उद्‍घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी झाले. ‘सीसीएस-२’ मानकानुसार डीसी फास्ट चार्जिंगची सुविधा असलेल्या वाहनांना जलद चार्जिंगही करता येणार आहे, अशी माहिती कंपनीचे उत्पादन प्रमुख महेश केसकर यांनी दिली. अवजड मालवाहतुकीत डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्याच्या उद्देशाने कंपनीने तळेगावातील आंबी येथे इलेक्ट्रिक अवजड वाहननिर्मिती प्रकल्प सुरू केला आहे.
या प्रकल्पात इलेक्ट्रिक ट्रक, ट्रॅक्टर-ट्रेलर आणि डंपरची निर्मिती, लिथियम-आयन बॅटरी पॅकची जोडणी तसेच स्वतंत्र बॅटरी चाचणी प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. प्रकल्पाची प्रारंभिक उत्पादन क्षमता वर्षाला प्रत्येक ‘शिफ्ट’मध्ये पाच हजार वाहनांची आहे, असेही कंपनीने नमूद केले.
------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT