vegetable 
पुणे

पुणेकरांनो चिंता करू नका; शहराला पुरेल इतका भाजीपाला उपलब्ध 

सकाळवृत्तसेवा

मार्केट यार्ड : शहरात रविवारी गुलटेकडी मार्केट यार्ड मुख्य बाजारासह उपबाजारात एकूण 854 गाड्यांची आवक झाली. या सर्व गाड्यांमधून 17 हजार 30 क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली. त्यामुळे शहराला पुरेल इतका भाजीपाला सध्या उपलब्ध आहे, अशी माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली. 

मार्केट यार्डातील मुख्य बाजारात 478, मोशी येथील उपबाजारात 213 गाड्या, मांजरी येथील उपबाजारात 160 गाड्यांमधून भाजीपाल्याची आवक झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाजार समितीकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्यात समितीला बऱ्यापैकी यश आले असल्याचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी सांगितले.तसेच अडत्यांनी शेतकऱ्यांना माहिती देऊन किमान महिनाभर मर्यादित शेतीमाल मागवावा असे आवाहन देशमुख यांनी केले आहे. 

बाजारात निर्जंतुकीकरणाची सुविधा 
बाजारात येणाऱ्या प्रत्येकाचे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी येथे निर्जंतुकीकरणाची सुविधा करण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वार क्रमांक चार याठिकाणी फवारणी यंत्र बसविले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सोलापुरातील १५ ऑर्केस्ट्रा बार अन् १४ कला केंद्रांना लागणार कायमचे कुलूप; सोलापूर पोलिसांनी मागवली माहिती; गृह विभागाचा नेमका आदेश काय? वाचा...

Pumpkin Jowar Idli: कमी तेल, भरपूर पोषण! नाश्त्यासाठी झटपट बनवा गरमागरम 'भोपळा-ज्वारी इडली'

आजचे राशिभविष्य - २९ जुलै २०२६

NEET Paper Leak: 'नीट पेपर लीक' प्रकरणात सीबीआयकडून चार्जशीट दाखल; शिवराज मोटेगावकरसह 13 आरोपींचा समावेश

Pune Online Toy Car Scam: टॉय कारच्या ऑनलाइन खरेदीत शिवाजीनगरातील महिलेची पावणेचार लाखांची फसवणूक

SCROLL FOR NEXT