पुणे

‘आयव्हीएफ’ तंत्रज्ञानाद्वारे चार मुऱ्हा रेडकांचा जन्म

CD

औंध, ता. ७ : राज्यातील पशुधनाच्या आनुवंशिक सुधारणेसाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाने ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. ताथवडे (पुणे) येथील शासकीय पशुपैदास प्रक्षेत्रात ‘ईटी आयव्हिएफ’ तंत्रज्ञानाद्वारे एकाच भ्रूण संकलनातून तीन मादी व एक नर अशा चार उच्च क्षमतेच्या मुऱ्हा रेडकांचा यशस्वी जन्म झाला आहे.
नागपूर येथील अत्याधुनिक प्रयोगशाळेमार्फत हा प्रयोग राबवण्यात आला. वाकड येथील पशुपालक स्वप्नील कलाटे यांच्या उच्च दुग्ध उत्पादक मुऱ्हा म्हशीच्या १७ अंडपेशींमधून पाच भ्रूण विकसित करण्यात आले. हे भ्रूण ताथवडे येथील दाई म्हशींमध्ये प्रत्यारोपित केल्यानंतर चार म्हशींनी यशस्वी गर्भधारणा केली.
या प्रकल्पाची तांत्रिक जबाबदारी डॉ. विष्णू जवणे यांनी सांभाळली, तर डॉ. रतिकांत नवटके यांनी दाई म्हशींचे आरोग्य व्यवस्थापन केले. डॉ. उदय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबवला जात असून, डॉ. उपेंद्र गायकवाड व डॉ. अमोल आहेर रेडकांचे संगोपन करत आहेत.
उच्च वंशावळीचे वळू तयार करण्यासाठी आणि दुग्ध व्यवसाय सक्षम करण्यासाठी हे तंत्रज्ञान क्रांतिकारक ठरेल, असा विश्वास पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रशांत किशोरांची पवार कुटुंबासोबत बैठक; सुनील तटकरे अनभिज्ञ; म्हणाले, ''ते आमच्यासाठी काम करतायेत माहीत नाही''

Abhijeet Dipke: घरासमोर CID अधिकारी, 'हिट स्प्रे' ग्रुपचा दावा अन्... DCP ला थेट फोन करत अभिजीत दिपकेंचे गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?

Mumbai Crime: फ्री वायफाय वापरणं महागात पडलं! वरिष्ठ बँक अधिकाऱ्याचा फोन हॅक, भामट्यांकडून २८ मिनिटांत ४ लाखांचा व्यवहार

Rohit Sharma: रोहित नाही तर कोण? 2027 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाकडे सलामीचे हे 3 पर्याय; एक नाव सर्वात आघाडीवर

FDA Crime : आयुर्वेदिक औषधांत आढळली बुरशी अन्‌ अळ्या; इंड्युकेअर फार्माचा उत्पादन परवाना रद्द

SCROLL FOR NEXT