Savitribai Phule Pune University Sakal
पुणे

परीक्षेसंबंधीचे मानधन आता थेट खात्यावर

विद्यापीठ सहकारी बॅंकातही करणार गुंतवणूक

सम्राट कदम - सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी सलग्न महाविद्यालयांमधील सेवकांचे परीक्षेसंबंधीचे मानधन आता थेट बॅंक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या वतीने लवकरच डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर (डीबीटी) प्रणालीचा अवलंब करण्यात येणार आहे.

अधिसभेच्या दुसऱ्या दिवशी प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर यांनी लेखा परीक्षण अहवाल सादर करताना ही माहिती दिली. यावेळी सभेचे अध्यक्ष आणि कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार आदी उपस्थित होते. विद्यापीठाच्या वतीने आता व्यापारी लेखांकन (मर्केंटाईल सिस्टम) पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. ही पद्धत अवलंबणारे हे राज्यातील पहिले विद्यापीठ आहे. भाषणात डॉ. जाधवर म्हणाले, "राष्ट्रीयकृत बॅंकांबरोबरच आता सहकारी क्षेत्रातील शेड्युल बॅंकांमध्ये विद्यापीठाच्या ३० टक्के रकमेची गुंतवणुक करण्यात येणार आहे.

यामुळे व्याजाच्या उत्पन्नामध्ये भर पडण्यास मदत होणार आहे. सहकारी क्षेत्रातील नामवंत बॅंकांची आर्थित स्थिती तपासून ही गुंतवणूक करण्यात येणार आहे." यावेळी त्यांनी देशपातळीवरील बदल लक्षात घेता लेख्यांमध्ये बऱ्याच सुधारणांना वाव असल्याचेही त्यांनी यावेळी मान्य केले. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये एकूण तूट ही १८ कोटी ८४ लाख ४५ हजार ३९४ रूपये असल्याचे लेखा परीक्षणातून पुढे आले आहे. याच आर्थिक वर्षात विद्यापीठाला ३४५ कोटी २७ लाख ६३ हजार ९५४ रुपयांचे उत्पन्न मिळाले, तर एकूण खर्च हा ३४२ कोटी ८२ लाख ९१ हजार ४०४ एवढा झाला. विद्यापीठाला २ कोटी ४४ लाख ७२ हजार ५५० रूपयांची रक्कम शिल्लक होती. हस्तांतरीत निधीसाठी २१ कोटी २९ लाख १७ हजार ९४४ दिल्यामुळे आता विद्यापीठाकडे १८ कोटी ८४ लाख ४५ हजार ३९४ रुपयांची आर्थिक तुट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anantnag Attack: जम्मू-काश्मीर पुन्हा हादरलं! अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला; पोलीस जवान शहीद, हल्ल्याची जबाबदारी कुणी स्वीकारली?

CJP Protest Delhi : आता चर्चा जंतर मंतरवरच! अन्यथा...; CJPची मोठी अट, काय म्हणाले?

Live Updates Marathi : पाटणात कॉंग्रेस कार्यालयाबाहेर भाजपचे आंदोलन, कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप

भारतीय संघात स्थान मिळत नाही म्हणून, कुलदीप यादवने निवडली दुसरी वाट! आता 'या' परदेशी संघासाठी खेळणार पाच वन डे सामने

Loni Kalbhor Accident: भरधाव ट्रकने धडक दिल्याने ७२ वर्षीय शेतकरी गंभीर जखमी; चालकावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT