पुणे

बर्दापूर येथे भीषण आग; जनावरांचा चारा जळून खाक

CD

जनावरांचा चारा जळाल्याने शेतकरी हतबल

बर्दापूर येथे भीषण आगीत कडब्याच्या गंजी, शेती साहित्य खाक
बर्दापूर, जि. बीड : उन्हाच्या झळांनी आधीच होरपळलेल्या शेतकऱ्यांवर आता आगीचे संकट कोसळले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे वीजवाहिनीच्या स्पार्किंगमुळे लागलेल्या भीषण आगीत जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा जळून खाक झाला. “आता जनावरांना काय खाऊ घालू?” अशी हतबल प्रतिक्रिया व्यक्त करत शेतकरी संतोष बजाज यांनी आपली व्यथा मांडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बर्दापूर ते लिंबगाव रोडलगत असलेल्या गट नंबर ५७८ मधील शेतात शनिवारी (ता. १०) दुपारी ही घटना घडली. शेतकरी संतोष सत्यनारायण बजाज यांच्या शेतातून गेलेल्या एलटी वीजवाहिनीच्या तारा सैल झाल्याने त्यांच्यात घर्षण होऊन ठिणगी पडली आणि काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले.
आगीत जनावरांसाठी साठवून ठेवलेल्या कडब्याच्या गंजी, सोयाबीन पिकाच्या गुळी पूर्णपणे जळून खाक झाल्या. तसेच पाईपलाईन, फळझाडे आणि शेती उपयोगी साहित्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आग इतकी भीषण होती की संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते.
घटनेनंतर परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची चर्चा परिसरात असून प्रशासनाने तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I: धक्कादायक! विश्वविजेता भारत हरला; आयर्लंडने करेक्ट कार्यक्रम केला, श्रेयसच्या नेतृत्वाची खराब सुरुवात; नेमकं काय घडलं?

भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटलं अन्... पिकअप व्हॅन दरीत कोसळली, ६ जणांचा जागीच मृत्यू

Latest Marathi News Live Update: भारत हा महिलांच्या सन्मानाचा पुरस्कार करणारा देश आहे - कदम

ऐकावं ते नवलंच! ब्रिटनच्या राजालाही भरावा लागतोय कर, ३७३ कोटींच्या टॅक्समागची नेमकी भानगड काय?

Karad Bus Stand Robbery: कऱ्हाड बसस्थानकातील जबरी चोरी उघडकीस; पती-पत्नी अटक

SCROLL FOR NEXT