farmers issue sakal
पुणे

शेतकऱ्यांवर उभ्या पिकांत मेंढ्या सोडून देण्याची वेळ

उत्पादित शेतीमालाला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

महाळुंगे : आंबेगाव तालुक्‍यात टोमॅटोपाठोपाठ कोबी, काकडी, दुधी भोपळा, ढोबळी मिरची व मका पीकही मातीमोल झाले आहे. किलोला एक रुपये ते सात रुपये बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही भागत नसल्याने कवडीमोल बाजारभावाने भाजीपाला विकण्याची वेळ आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

कळंब, चांडोली बुद्रूक, लौकी, साकोरे, नांदूर, चास, ठाकरवाडी, महाळुंगे पडवळ आदी ४० गावांत शेतकरी कोबी, फ्लॉवर, घोसाळी व काकडी पीक घेत आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तरकारी बाजारात विक्री केल्यानंतर मालाचे वजन झाल्यानंतर रोख पैसे मिळत आहे. त्यामुळे नगदी पैसे मिळवून देणारी पिके घेण्याकडे शेतकरी कल असतो.

तालुक्‍यात सरासरी तीन ते चार हजार एकर क्षेत्रात कोबी, फ्लॉवर व काकडीचे पीक शेतकऱ्यांनी घेतल्याचा अंदाज आहे. सोमवारी (ता.२३) मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कोबी दीड रुपये ते सात रुपये, काकडी दोन रुपये ते सात रुपये, फ्लॉवर एक रुपये ते दहा रुपये, दुधी भोपळा एक रुपये ते दहा रुपये, मका तीन रुपये ते सात रुपये, तर ढोबळी मिरचीस चार ते सात रुपये प्रतिकिलो असा सरासरी बाजारभाव मिळत आहे. उत्पादित शेतीमालाला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

उभ्या पिकांत मेंढ्या सोडून देण्याची वेळ

सततच्या वातावरणातील बदलामुळे पिकावर करपा, अळी, पाकोळी आदी रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. उत्पादन खर्चही भागत नसल्याने शेतकऱ्यांनी कोबी व फ्लॉवरच्या उभ्या पिकांत मेंढ्या सोडून देण्याची वेळ आली आहे.

नुकतीच काकडी पिकाची काढणी करायला सुरुवात केली, तोच बाजारभाव कोसळले आहेत. तीन ते पाच रुपये किलो या कवडीमोल बाजारभावाने काकडीची खरेदी व्यापारी करत आहेत.

- शंकर कोंढवळे, शेतकरी, कळंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"ट्रम्पला ठार मारणे हे आपले कर्तव्य!" ; इराणमध्ये खामेनींच्या अंत्यविधीवेळी चिथावणीखोर घोषणाबाजी, मोठ्या प्रमाणात गर्दी

Nitesh Rane Non Bailable Warrant : नितेश राणेंना गोवा पोलिस अटक करणार? अजामीनपात्र वॉरंट; टोलनाका तोडफोड प्रकरणात न्यायालयाची कारवाई

Ramdas Athawale: ठाकरेंनी रामरक्षा नव्हे तर ‘शिवसेना रक्षा’ आंदोलन करावे; मंत्री आठवलेंचा टोला

AUS W vs ENG W Final: आज महिला टी-20 विश्वचषक फायनल; जाणून घ्या कुठे, किती वाजता अन् कोणत्या चॅनेलवर पाहाल मॅच... महामुकाबला

Mumbai Rain News : झाडं रस्त्यावर पडल्यानं बेस्टचा खोळंबा, डझनभर मार्ग बदलले; प्रवाशांचे प्रचंड हाल

SCROLL FOR NEXT