junnar.jpg 
पुणे

आधुनिक तंत्रज्ञान अवलंबून फायद्याची शेती करा : प्रविण माने

डॉ. संदेश शहा

इंदापूर : ''देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असून शेतकरी हा या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती व्यवसायास आधुनिकतेची जोड देवून दर्जेदार शेतीमाल उत्पादन करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी प्रशिक्षणामधील शास्त्रोक्त मार्गदर्शनाचा फायदा घेवून फायद्याची शेती करणे ही काळाची गरज आहे,'' असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम विभाग प्रमुख प्रविण माने यांनी केले.

पुणे जिल्हा परिषद, इंदापूर पंचायत समिती तसेच, बारामती कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने शिरसोडी ( ता. इंदापूर ) येथे शेतकऱ्यांसाठी ऊस पिकावरील हुमणी, मका पिकावरील लष्करी अळी नियंत्रण करण्यासाठी शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना सभापती माने बोलत होते. तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे, इंदापूर पंचायत समितीचे कृषी अधिकारी मोहन पवार, विस्तार अधिकारी महादेव भंडलकर, कृषी सहाय्यक हनुमंत बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अशोक चोरमले, सचिन खामगळ, ज्योतीराम पेठकर, पोपट शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

आरोग्य व बांधकाम सभापती प्रविण माने म्हणाले, ''जिल्हा परिषदेच्या शेतकरी सक्षमीकरणाच्या विविध योजनांचा लाभ घेवून शेतकऱ्यांनी शेतीपुरक उद्योजकता विकसित करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशूसंवर्धन विभाग, महिला व बालकल्याण विभागाची डी. बी. टी योजना, वैयक्तिक लाभाच्या योजने अंतर्गतचे अर्ज 15 जुलै पर्यंत दाखल करावे, असे आवाहन त्यांनी केले. 

 यावेळी बारामती कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ मिलिंद जोशी यांनी ऊसावर पडणाऱ्या हुमणी तसेच मका पिकावर पडणाऱ्या लष्करी अळी या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शास्त्रोक्त पध्दतीने मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी कामगंध सापळे, लाईट ट्रॅप ची प्रात्यक्षिके उपस्थित शेतकऱ्यांना करून दाखवले. यावेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी समयोचित उत्तरे दिली. यावेळी अॅग्रो अॅम्बुलन्सच्या माध्यमातून शेतक-यांना पीक संरक्षण सल्ला व उपाययोजना याची परिक्षणासह माहिती देण्यात आली. सुत्रसंचालन शिरसोडी गावचे उपसरपंच सुधाकर करे यांनी केले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : पुण्यात प्रेशर मिड आणि प्लाझ्मा वर बंदी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा सुरू

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT