पुणे

कोल्हापूर: कृषी विभागाच्या आकृतीबंधाविरोधात शिरोळमध्ये कर्मचाऱ्यांचा निषेध

CD

‘कृषी’च्या आकृतिबंधाविरोधात
शिरोळमध्ये कर्मचाऱ्यांचा निषेध

ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : कृषी विभागाचा प्रस्तावित आकृतिबंध रद्द करून तज्ज्ञ समिती स्थापन करावी आणि शेतकरीकेंद्रित व सक्षम नवीन आकृतिबंध तयार करून मंजूर करावा, या मागणीसाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. शिरोळ तालुक्यात कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला. मागण्यांचे निवेदन तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना देण्यात आले.
मंडळ कृषी अधिकारी प्रकाश फाळके, उपकृषी अधिकारी संघटनेचे जिल्हा सचिव संपतराव मुळीक, संजय सुतार, रविकांत माने, विश्वास गुरव, सहायक कृषी अधिकारी प्रमोद कांबळे, जयपाल बेरड आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे, की कृषी विभागाचा प्रस्तावित आकृतिबंध शेतकरी तसेच तांत्रिक संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हितास बाधा पोहोचविणारा आहे. महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाने या आकृतिबंधास विरोध दर्शवून तो स्थगित अथवा रद्द करण्याची मागणी केली आहे. मात्र या बाबत महासंघाला अद्याप अधिकृत निर्णय कळविण्यात आलेला नाही.
विद्यमान आकृतिबंधात किरकोळ बदल करून तोच कायम ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसते. ही तात्पुरती मलमपट्टी असून, भविष्यात प्रशासकीय अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रस्तावित आकृतिबंध पूर्णतः रद्द करून नव्याने आकृतिबंध तयार करावा आणि त्यात कृषी महासंघाच्या मागण्यांचा विचार करावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: नव्या पर्वाची सुरुवात पण स्मृती मंधाना आणि झिम्बाब्वेच्या खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून मैदानावर का उतरले? नेमकं काय घडलं?"

Raju Shetty : केंद्र सरकारचे नाक दाबण्यासाठी साखर उत्पादन बंद करा; राजू शेट्टी यांचे आवाहन

Elon Musk: ''मी कोणत्याही गोऱ्या व्यक्तीला देशाच्या निर्णयात हस्तक्षेप करू देणार नाही''; इलॉन मस्क वादावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

Delhi Protest High Drama : 'तिरंगा मार्च' सुरू होण्यापूर्वी अवघ्या १० मिनिटे आधी मोठी कारवाई! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून पुन्हा ताब्यात

Marathi News Live Updates: MPSC पेपरफुटी चौकशी समितीची घोषणा, पण तुकाराम मुंढेंना अद्याप लेखी आदेशच नाही

SCROLL FOR NEXT