पुणे

बोधेगाव -पावसासाठी बोधेगावकरांची पायपीट,काशी केदारेश्वराला साकडे

CD

पावसासाठी बोधेगावकरांची पायपीट
काशी केदारेश्वराला साकडे ः शेतकरी, व्यापारी, नोकरदारांचा सहभाग

बोधेगाव, ता.१९ः पावसासाठी बोधेगावातील विविध क्षेत्रांतील नागरिकांनी एकत्र येत बोधेश्वर महाराज मंदिरापासून गोळेगाव येथील श्री क्षेत्र काशी केदारेश्वर मंदिरापर्यंत तब्बल १५ किलोमीटरची पायी वारी केली. हरिनामाचा गजर करीत ‘आता तरी पाऊस पडू दे’ अशी आर्त हाक देत केदारेश्वराला साकडे घालण्यात आले.

जून महिन्याच्या अखेरीस झालेल्या रिमझिम पावसावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी कपाशी, सोयाबीन, बाजरी, उडीद, मूग आदी पिकांची पेरणी केली. मात्र, त्यानंतर दमदार पावसाने पाठ फिरवल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. पिकांवर रोग-किडीचा प्रादुर्भावही दिसू लागला आहे. त्यामुळे पिकांचे भवितव्य पावसाच्या एका दमदार सरीवर अवलंबून असल्याचे चित्र आहे. पिण्याच्या पाण्याची चिंता वाढत आहे. नदी-नाले वाहते व्हावेत, विहिरींची पाणीपातळी वाढावी आणि तोंडाशी आलेला घास पावसाअभावी हिरावला जाऊ नये, अशी भावना दिंडीतील नागरिकांनी व्यक्त केली. पायी दिंडीत व्यापारी प्रल्हाद शिंदे, सेवानिवृत्त उत्पादन शुल्क अधिकारी भैय्यासाहेब घोरतळे, मच्छिंद्र पवार, कैलास अंधारे, संतोष शिंदे, माऊली शिंदे, मदन घोरतळे, पांडुरंग वाघमारे, वसंतराव आधापुरे, किरण पौळ यांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Superstition Law: बुवाबाजीला आळा घालणार कसा? जादूटोणाविरोधी कायदा लागू होऊन १३ वर्षे, नियम करण्याकडे सरकारचे दुर्लक्ष

IND vs SL 2nd Test: मोठा धक्का! दुसऱ्या कसोटीतून तीन प्रमुख खेळाडूंची माघार; आता WTC Final मध्ये पोहोचणार कसे?

Maharashtra Education: महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेची चिंताजनक स्थिती! नववी-दहावीत ९ टक्के विद्यार्थी शाळाबाह्य; एकशिक्षकी शाळांची संख्याही वाढली

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर पुन्हा भाजपला डिवचले

Kupwad MIDC Two dead Shock : सांगलीत क्रेनचा विद्युतवाहिनीला धक्का; दोघांचा जागीच मृत्यू, कुपवाड एमआयडीसीतील घटना

SCROLL FOR NEXT