पुणे

सातारा शेती औजारांसाठी अनुदानावर अर्ज सादर करण्याचे आवाहन

CD

शेती अवजारांसाठी अनुदानावर
अर्ज सादर करण्याचे आवाहन

ॲग्रोवन वृत्तसेवा
सातारा : जिल्हा परिषद सेस २०२६-२७ अंतर्गत थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) या पद्धतीने महाबळेश्वर पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत शेतीविषयक विविध अवजारे व उपकरणांसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत निवडक अवजारांवर शेतकऱ्यांना किमान ४० ते ७५ टक्क्यांपर्यंत अवजारनिहाय अनुदान दिले जाणार आहे.
या योजनेमध्ये कडबाकुट्टी, ताडपत्री, एचडीपीई व पीव्हीसी पाईप, ३ एचपी तसेच ५ आणि ७.५ एचपी विद्युत पंपसंच, पॉवर वीडर, बॅटरी स्प्रे पंप, कोळपे, सोलर प्रकाश सापळे, ताग व धैंचा बियाणे यांचा समावेश आहे. यासोबतच कृषी यांत्रिकीकरणांतर्गत पलटी नांगर, पेरणी यंत्र, खोडवा कटर, पाचट कुट्टी आणि बियाणे टोकण यंत्र यांसारख्या आधुनिक शेती अवजारांसाठीही अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे.
तालुक्यातील सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी आवश्यक त्या योग्य कागदपत्रांसह आपले अर्ज कृषी विभाग, पंचायत समिती महाबळेश्वर येथे सादर करावेत, असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती शकुंतला रमेश चोरमले आणि उपसभापती संजय हरिश्चंद्र मोरे यांनी केले आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबरपर्यंत असून, अधिक माहितीसाठी तसेच विहित नमुन्यातील अर्जासाठी पंचायत समितीच्या कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Highway 53 : महिनाभरानंतर 'बायपास'वर एकेरी वाहतूक सुरू, एक बाजू बंदच; दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू होण्यासाठी आणखी किती महिने लागणार?

Police Sub Inspector Crime : पोलीस उपनिरीक्षकाने रेल्वेखाली घेतली उडी, नेमकं कोणत्या कारणातून उचललं टोकाचं पाऊल

Suryakumar Yadav: सूर्यकुमारची पहिली कमाई किती होती? पैसे मिळाले अन् त्याने केलं असं काही, ऐकून तुम्हीही म्हणाल ‘जिद्द असावी तर अशी!’

Maharashtra Monsoon Prediction : राहुल गांधींविरोधात पोलिसांमध्ये तक्रार

मी नवरा नाही तर सासू बघून लग्न केलं... मराठमोळ्या अभिनेत्रीचं चकीत करणारं वक्तव्य; म्हणते- तिच्याशी जमणं खूप महत्त्वाचं होतं...

SCROLL FOR NEXT