पुणे

महाराष्ट्रातील रक्तपेढ्यांसाठी एफडीएचा कठोर आदेश

CD

रक्तपेढ्यांवर अचानक तपासणीचा फास
शिबिरांवरही एफडीएची नजर; तफावत आढळल्यास कारवाई शक्य
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : राज्यातील रक्तपेढ्या, रक्त साठवण केंद्रे आणि रक्तदान शिबिरांच्या कामकाजावर आता अन्न व औषध प्रशासनाची (एफडीए) नजर राहणार आहे. एफडीएचे अधिकारी आणि औषध निरीक्षक यापुढे या ठिकाणी अचानक तपासणी करणार आहेत. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन, रक्तसाठ्यातील तफावत किंवा विनापरवाना कामकाज आढळल्यास संबंधित रक्तपेढीचा परवाना निलंबित किंवा रद्द करण्याची कारवाई होऊ शकते.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील रक्तपेढ्या आणि रक्त साठवण केंद्रांना औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा, १९४० मधील तरतुदींचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्य रक्त संक्रमण परिषदेनेही रक्तपेढ्यांना नियमांची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रक्त आणि रक्तघटकांचा कायद्यानुसार औषध म्हणून समावेश होत असल्याने रक्तदाते आणि रुग्णांची सुरक्षितता लक्षात घेऊन ही मोहीम राबविण्यात येत आहे. सर्व रक्तपेढ्यांना पुढील ३० दिवसांत त्यांच्या कामकाजाचे अंतर्गत परीक्षण करून आढळलेल्या त्रुटी दूर कराव्या लागणार आहेत.
‘ई-रक्तकोश’ प्रणाली
राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना रक्त आणि रक्तघटकांच्या साठ्याची माहिती ‘ई-रक्तकोश’ प्रणालीवर दररोज अद्ययावत करणे बंधनकारक आहे. प्रत्यक्ष साठा आणि पोर्टलवरील नोंदीमध्ये तफावत आढळल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाणार आहे. अचानक तपासणीदरम्यान या नोंदींचीही पडताळणी केली जाणार आहे.
शिबिरातील रक्त थेट देता येणार नाही
रक्तदान शिबिरांबाबतही कडक नियम लागू करण्यात आले आहेत. ‘एक युनिट रक्ताच्या बदल्यात एक युनिट रक्त’ अशी अट घालून एखाद्या रुग्णाच्या नातेवाइकाला रक्तदान करण्यास भाग पाडता येणार नाही. शिबिरात संकलित केलेले रक्त थेट रुग्णाला किंवा अन्य ठिकाणी वितरित करता येणार नाही. हे रक्त प्रथम संबंधित रक्तपेढीत आणून आवश्यक तपासण्या पूर्ण करणे बंधनकारक असेल.
संसर्गजन्य आजारांची तपासणी
संकलित रक्ताच्या युनिटची एचआयव्ही, हेपेटायटिस बी, हेपेटायटिस सी, सिफिलीस आणि मलेरिया या पाच संसर्गजन्य आजारांसाठी चाचणी करणे बंधनकारक आहे. सर्व तपासण्या पूर्ण झाल्यानंतरच रक्ताचा वापर करता येणार आहे.
केवळ ऐच्छिक आणि विनामूल्य रक्तदान
व्यावसायिक किंवा मोबदला घेणाऱ्या रक्तदात्यांकडून रक्त स्वीकारण्यास बंदी आहे. केवळ ऐच्छिक आणि विनामूल्य रक्तदात्यांकडूनच रक्तसंकलन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रक्तदात्यांचे वय आणि इतर वैद्यकीय निकषांची पूर्तता करण्याची जबाबदारीही रक्तपेढ्यांवर राहणार आहे.
नियमभंग झाल्यास कारवाई
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रक्तपेढ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यासोबतच परवाना निलंबित किंवा रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते. गंभीर प्रकरणांमध्ये औषधे व सौंदर्यप्रसाधने कायद्यातील कलम २७ अंतर्गत फौजदारी कारवाईही केली जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करा, संयुक्त जमीन मोजणीला गती द्या; शक्तिपीठ महामार्गाबाबत आवाहन

Marathi News Live Updates : अंमलबजावणी संचालनालयाचे मुंबई आणि वडोदरा येथील सात निवासी आणि व्यावसायिक ठिकाणे आणि तीन बँक लॉकर्सवर छापे

Encroachment : नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

Ganeshotsav : गणेश उत्सवासाठी मूर्तीकारांची लगबग सुरु; शेवटचा हात फिरवून ग्राहकांच्या आगमनाची प्रतिक्षा

SCROLL FOR NEXT