Ganapati Sakal
पुणे

साध्या उत्सवासाठीही आर्थिक विघ्न

गणेश मंडळांचे कार्यकर्ते हवालदिल; उपक्रमांना घालावी लागणार मुरड

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आता मंडळांना वर्गणी मिळत नाही. तसेच जाहिरातीही नाहीत. मंदिरे बंद असल्याने दानपेट्यांमध्येही पैसे नाहीत. त्यामुळे छोट्या व मोठ्या मंडळांसमोरही खर्च भागवायचा कसा असा प्रश्‍न आहे.मागीलवर्षी साधेपणावर भर दिला, त्यातून उरलेल्या पैशांचा उपयोग अन्नधान्य किट, जेवण, पाण्याच्या बाटल्या, घरोघरी भाजीपाला, रक्तदान यांसारख्या असंख्य उपक्रमांसाठी वापरला. कोरोनाबाधीत रुग्ण, त्यांच्या नातेवाइकांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयोगात आणला. त्यामुळे बहुतांश मंडळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाली आहेत. (Pune News)

साईनाथ मंडळ ट्रस्ट प्रमुख पियुष शहा म्हणाले, ‘‘कोरोना, लॉकडाउनमुळे मंडळांकडे पैसेच नाहीत. मागीलवर्षी कसेबसे उत्सव व उपक्रमांसाठी पैसे खर्च केले. यंदा काय करावे, हा प्रश्‍न आहे. जाहिराती व कमानींना परवानगी मिळाल्यास मंडळांपुढील किमान आर्थिक संकट दूर होईल.’’ मंडळांची आर्थिक परिस्थिती वाईट आहे. जाहिराती व मंडपाची परवानगी मिळाल्यास किमान काही प्रमाणात मंडळांना आर्थिक मदत होऊ शकेल, असे सेवा मित्र मंडळाचे प्रमुख शिरीष मोहिते यांनी सांगितले.

- अण्णा थोरात,

अध्यक्ष, अखिल मंडई मंडळ

काय आहेत कारणे....

-त्सवावर कोरोनाचे सावट व निर्बंध

-वर्षभर मंदिरे बंद असल्याने

दानपेट्या रिकाम्या

-लोकांकडून वर्गणी मिळण्याची

चिन्हे कमी

-जाहिराती, कमानींवर आर्थिक गणित; मात्र पोलिसांची परवानगी नाही

साध्या उत्सवासाठी खर्च-

४० हजार

मंदिरासमोरील छत

१५ हजार

लाइट/स्पीकर

१५ हजार

हार, फुले, सजावट

५ हजार

प्रसाद

१५ हजार

छोटे उपक्रम

१० हजार

पूजा, धार्मिक विधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : केतनला धक्का कोणी दिला? पक्का पुरावाच नाही; पोलिसांनी कोर्टाकडे मागितली सियाच्या 'लाय डिटेक्टर' चाचणीची परवानगी

मुंबईसे वांद्रे कैसे जाते है? थेट पाकिस्तानमधून फोन आल्यानं खळबळ, पोलिसांकडून चौकशी सुरू

Shardul Thakur: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली माझ्यासोबत अन्याय झाला! शार्दुल ठाकूरचा थेट आरोप; टीम इंडियाबाबत केला मोठा खुलासा

'तुझे केस विचित्र आहेत' ऑडिशनवेळी मंदार जाधवला दिलेलं रिजेक्शनचं विचित्र कारण, म्हणाला...

Amol Kolhe leaving Sharad Pawar : खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडणार?; 'महायुतीकडून ऑफर आल्यास विचार करू'

SCROLL FOR NEXT