Firing Sakal
पुणे

कोथरूड येथील मेट्रोशेडमध्ये एकावर गोळीबार

पिस्तुलातील चार ते पाच रिकाम्या पुंगळ्या आढळल्या, मेट्रोचा कर्मचारी जखमी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोथरुड (kothrud) येथील मेट्रोशेडजवळ बुधवारी सायंकाळी व गुरूवारी सकाळी पिस्तुलातील चार ते पाच रिकामी काडतुसे आढळून आल्याने खळबळ उडाली. लष्कराच्या प्रशिक्षणा दरम्यान करण्यात येणाऱ्या गोळीबाराची ही घटना आहे, की अन्य काही याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. मात्र, मेट्रो प्रकल्पातील एक कर्मचारी जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

कोथरुड येथील जुना कचरा डेपो येथे मेट्रो प्रकल्पाचे कारशेड आहे. संबंधित ठिकाणी बुधवारी सायंकाळी गोळीबार झाल्याची माहिती कोथरुड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा त्यांना तेथे पिस्तुलातील दोन ते तीन रिकामी काडतुसे आढळून आली होती. दरम्यान, गुरूवारी दुपारी पुन्हा एकदा याच पद्धतीने आणखी काही रिकामी काडतुसे तेथे आढळून आली. या घटनेनंतर कोथरुड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

कारशेडच्या पलिकडील बाजुला लष्करी जवानांचे प्रशिक्षण केंद्र आहे. त्यांच्याकडून बुधवारी प्रशिक्षणादरम्यान गोळीबार झाला असण्याची शक्‍यता आहे. त्याचपद्धतीने बुधवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास मेट्रोकारशेडच्या पत्र्याला छेदून पिस्तुलातील गोळ्या आतमध्ये आल्या. त्यातील एक गोळी तेथे काम करणाऱ्या एका कामगाराला लागली, त्यामध्ये तो जखमी झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

दरम्यान, पोलिसांनी असे काही घडलेच नसल्याचे सांगितले, मात्र पिस्तुलातील रिकाम्या पुंगळ्या आढळल्याचे मान्य केले आहे. तसेच या घटनेत जखमी झालेल्या तरुणाने आपल्याला वेल्डींग काम करताना लागले आहे, असे सांगितल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तर या प्रकरणाबाबत लष्कराकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे गोळीबार झाला का ? झाला असल्यास तो नेमका कोणी आणि का केला, या प्रश्‍नांची अद्याप उत्तरे मिळालेली नाहीत. दरम्यान, परिमंडळ तीनच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, कोथरुड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

महामेट्रो म्हणते.......

या बाबत महामेट्रोचे महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे म्हणाले, ‘‘आमचा कर्मचारी कारशेडमध्ये काम करीत असताना, बुधवारी सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास त्याच्या छातीला गोळी चाटून गेली. त्याने आजूबाजूला बघितले तेव्हा, २- ३ काडतुसे सापडली. आम्ही तातडीने पोलिसांना बोलविले. त्यांच्याकडून तपास सुरू आहे. आज सकाळीही दोन रिकाम काडतुसे सापडली. आमचा कर्मचारी व्यवस्थित आहे.’’ पोलिस करीत असलेल्या तपासाला महामेट्रो सहकार्य करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2026: पाकिस्तान स्पर्धेतून 'आऊट'? न्यूझीलंडच्या विजयाने वाढवलंय टेन्शन, पाहा कसं आहे समीफायनलसाठी समीकरण

Solapur News: चक्क.. सरकारी जागांची खरेदी-विक्री; आ. विजय देशमुखांनी विधानसभेत उठवला आवाज, साेलापूर जिल्ह्यात नेमकं काय घडलं!

Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्गात बदल निश्चित! सोलापूर जिल्ह्यापासून नवा मार्ग, मुख्यमंत्र्यांनी सांगितला कसा असेल बदल..

Viral Video: याला म्हणतात नशिबाची फिरकी! Window Seat बुक करूनही मिळाला धक्का; व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम अभिनेत्रीची हिंदी मालिकेत एंट्री; दिसणार भयानक अवतारात; प्रोमो पाहून प्रेक्षक थक्क

SCROLL FOR NEXT