Sharad Pawar Narendra Modi Sakal Digital
पुणे

Surgical Strike: सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख आज होतोय पण, पहिल्यांदा पुण्यात...; पवारांनी PM मोदींसमोरच सांगितला इतिहास

पुण्यात पार पडलेल्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख आज होतोय पण यापूर्वीच या पुण्यातचं सर्जिकल स्ट्राईक झाला होता. हा सर्जिकल स्ट्राईक छत्रपती शिवाजी महाराजांकडून लाल महालात झाला असल्याचा इतिहासच शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सांगितला.

पुण्यात पार पडलेल्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. हा पुरस्कार PM मोदींना प्रदान करण्यात येत आहे. (First Surgical strike happened in Pune Sharad Pawar told history in front of PM Modi)

शरद पवार म्हणाले, "यादवांचं संस्थान असेल किंवा दिल्लीतील मुघलांचं संस्थान असेल अशी अनेस संस्थानं या देशात होऊन गेली. पण महाराष्ट्रात शिवछत्रपतींचं कार्य एका वेगळ्या दिशेनं होतं. त्यांनी राज्य उभं केलं. पण ते भोसल्याचं राज्य नव्हतं ते हिंदवी स्वराज्य होतं. ते रयतेचं राज्य होत. हे रयतेचं राज्य प्रस्थापित करण्याचं काम या पुणे शहरात झालं. हा पुण्याचा एक गौरवशाली इतिहास आहे"

"या देशाच्या जवानांनी देशाचं रक्षण करण्यासाठी एक प्रकारचं सर्जिकल स्ट्राईक केला होता. सर्जिकल स्ट्राईकची चर्चा आत्ता होते. पण लाल महालात शाईस्तेखानानं ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर या देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक यादेशात झाला ही गोष्ट विसरता येणार नाही," अशा शब्दांत पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच इतिहासाचा उल्लेख केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण! 11 सप्टेंबरला पुन्हा दर कोसळणार? जाणून घ्या ताजी अपडेट

‘त्याला माझी इनसिक्युरिटी वाटायची’; अनेक वर्षांनंतर नीना गुप्तांनी उघड केलं गुपित, म्हणाल्या...'माझ्यापेक्षा जास्त...'

ChatGPT's 80s Photo Trend: Instagram वर व्हायरल होतोय 'ChatGPT ’80s Photo Trend'; 'हा' सोपा प्रॉम्प्ट वापरून तयार करा तुमचा ८० च्या दशकातील रेट्रो लूक!

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Share Market Today: इराणच्या अमेरिकेला धमकीने शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; कोणत्या शेअर्सला मोठा फटका?

SCROLL FOR NEXT