Gaur Sakal
पुणे

दौंड शहरात पहिल्यांदाच रानगव्यांच्या जोडीचे दर्शन

दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) रानगव्यांची जोडी आढळून आली आहे.

प्रफुल्ल भंडारी

दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) रानगव्यांची जोडी आढळून आली आहे.

दौंड - दौंड शहरातील (Daund City) राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) रानगव्यांची (Gaur) जोडी आढळून आली आहे. दौंड शहर किंवा तालुक्यात गव्यांचे अधिवास नसून शहरात पहिल्यांदाच गव्यांचे दर्शन झाले आहे.

दौंड - कुरकुंभ व दौंड - लिंगाळी रस्त्यालगत वन विभागाचे राखीव वन क्षेत्र आहे व त्याला लागूनच एसआरपीएफ गट क्रमांक पाच व गट क्रमांक सातचे मुख्यालय आणि वसाहत आहे. ११ जानेवारी रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान गव्यांची एक जोडी गट क्रमांक पाचच्या जॅागिंग ट्र्रॅक वरून गटाचे समादेशक तथा पोलिस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या शासकीय निवासस्थानाजळ आली. कर्तव्यावरील पोलिस अंमलदार श्री. कुसाळकर व लाइन पोलिस श्री. घुले यांनी ही जोडी पाहिली. गव्यांना कोणी हटकले नाही त्यामुळे ते पुढे निघून गेले. सदर गवे नेमके कोठे गेले?, याविषयी शोध घेतला जात आहे.

सदर गवे जॅागिंग ट्रॅक वरून आत आले आणि त्यानंतर गोकुळ हॅाटेलच्या दिशेने पुढे निघून गेले आहेत, अशी माहिती समादेशक तानाजी चिखले यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

Latest Marathi News Live Update : कोकणातही दुष्काळाची परिस्थिती; भातपिकाला मोठा फटका

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT