पुणे

हिंजवडी कचरा प्रकल्पासाठी "एमआयडीसी'तर्फे पाच एकर 

सकाळन्यूजनेटवर्क

पुणे - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) हिंजवडी येथील कचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या उभारणीसाठी पाच एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. या जागेच्या मंजुरीबाबतचे पत्र सोमवारी जिल्हा परिषदेला दिले. हिंजवडीतील प्रकल्प देशातील कचरा व्यवस्थापनाचे उत्तम मॉडेल म्हणून विकसित करणार असल्याचे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आज सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे जिल्ह्यातील गावांमध्ये शहराप्रमाणेच मोठया प्रमाणात कचरा समस्या भेडसावत आहे. यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून गावनिहाय सूक्ष्म नियोजन आराखडे तयार केले आहेत. यामध्ये आपापल्या गावातील कचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे गावागावांतील कचऱ्याची समस्या सोडविता येणार असल्याचेही प्रसाद यांनी स्पष्ट केले. 

हिंजवडी (ता. मुळशी) येथे हिंजवडी, माण, म्हाळुंगे या तीन प्रमुख गावांसह आजूबाजूच्या गावांतील कचरा व्यवस्थापनासाठी प्रकल्प उभारला जाणार आहे. यानुसार गावस्तरावर कचरा संकलन, त्याचे व्यवस्थापन केले जाणार आहे. दरम्यान, आयुष प्रसाद यांनी आज हिंजवडी येथे हिंजवडी, माण व म्हाळुंगे येथील नियोजित घनकचरा व्यवस्थापनबाबतचा आढावा घेतला. या वेळी जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि पुुणे महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी, क्रेडाईचे प्रतिनिधी आणि तिन्ही गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT