pune flood situation update esakal
पुणे

Pune Rain Update: पुणे जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर... मुठा खोरेतील गावांचा संपर्क तुटला, मुळा नदीला महापूर Video पाहा

Flood situation in Pune city : पुणे जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर आहे. मुळा नदीला आलेल्या महापुरामुळे गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाने बचाव आणि मदत कार्यात जोर लावला आहे. नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Sandip Kapde

खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे पुणे जिल्ह्यातील नागरिकांची चिंता वाढली आहे. मुळशीतील मुळा नदीचे पाणी शिवारात आले आहे, ज्यामुळे मुठा खोरेतील गावांचा संपर्क तुटला आहे. घोटावडेत मुळा नदीला महापूर आला असून मुळशी धरणातून अडीच हजार क्यूसेकने पाणी सोडले जात आहे.

पुणे जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर आहे. मुळा नदीला आलेल्या महापुरामुळे गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाने बचाव आणि मदत कार्यात जोर लावला आहे. नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आपत्ती व्यवस्थापन आणि बचाव कार्य-

पिंपरी-चिंचवड, मावळ, आणि लोणावळा भागांमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. मळवली भागातील एका बंगल्यामध्ये 20 पेक्षा जास्त पर्यटक अडकले होते, ज्यांना शिवदुर्ग बचाव दलाने गळ्यापर्यंतच्या पाण्यातून बाहेर काढले. डॅम ओव्हरफ्लो होण्यापासून वाचवण्यासाठी खडकवासला धरणातून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे सिंहगड रोड पाण्यात बुडाला असून महापालिका कर्मचारी पाण्याच्या निचऱ्यासाठी कार्यरत आहेत.

अजित पवारांची आपत्कालीन बैठक-

पावसामुळे परिस्थिती गंभीर होत असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सतत बैठका घेतल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने पूरस्थिती पाहता शाळांमध्ये सुट्टी जाहीर केली आहे. मदत आणि बचाव कार्य जोरात सुरू आहे. पुणे शहरातील एकता नगर येथे लष्कराने मोर्चा संभाळला आहे. तेथील परिस्थिती गंभीर असून चार जणांचा मृत्यू देखील झाला आहे.

पुण्यातील बचाव कार्य-

पुण्यात भारतीय सेना बचाव कार्यात गुंतली आहे. आता पर्यंत 400 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले गेले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की सिंहगड रोड भागात लष्कराच्या दोन तुकड्या तैनात केल्या आहेत. एनडीआरएफ, अग्निशमन विभाग, जिल्हा आणि शहर आपत्ती व्यवस्थापन टीम्सही कार्यरत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, गरज पडल्यास पावसामुळे प्रभावित लोकांना हवाई मार्गाने हलवण्यात येईल. 

मुंबई, पुणे, ठाणे, पालघर यांसह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे रस्त्यांपासून रेल्वे ट्रॅकपर्यंत सर्वत्र पाणी भरलेले आहे. वाहतूक देखील जाम झाली असून उड्डाणे आणि ट्रेन संचालनामध्ये उशीर होत आहे. पुणे आणि कोल्हापूर भागांमध्ये परिस्थिती गंभीर असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईत देखील पावसाने हाहाकार माजवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT