तळेगाव दाभाडे, ता. २२ : अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी वडगाव मावळ परिसरात संयुक्त कारवाईत सात लाख ९७ हजार ९३० रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. शुभम ज्ञानेश्वर म्हाळसकर (वय ३५, रा. म्हाळसकर वस्ती, वडगाव मावळ) आणि गणेश नारायण जगनाडे (वय ४१, रा. बदालवाडी, नवलाख उंब्रे) अशी आरोपींची नावे आहेत. अन्न सुरक्षा अधिकारी अनिकेत भगवानराव भिसे यांच्या फिर्यादीवरून वडगाव मावळ पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
१९ ऑगस्टला रात्री साडेदहा ते २० ऑगस्ट रोजी पहाटे सव्वातीन या वेळेत म्हाळसकर वस्तीतील पडक्या खोलीत तसेच बदालवाडी व नवलाख उंब्रे येथील पत्र्याच्या शेडमध्ये कारवाई करण्यात आली. म्हाळसकरकडून २ लाख ६७ हजार २१० रुपये, तर जगनाडेकडून ५ लाख ३० हजार ५२० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला.
दरम्यान, माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता, ‘गुन्हा दाखल आहे; मात्र माहिती द्यायची की नाही, याबाबत साहेबांना विचारावे लागेल,’ असे उत्तर देण्यात आल्याचे पत्रकारांनी सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून माध्यमांना अधिकृत माहिती वेळेत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.