संत तुकारामनगर - येथील पदपथावर छोट्या विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. तसेच रस्त्यावरच दुचाकी वाहने बेशिस्तीने लावली जात असल्याने वाहतुकीला अडथळा होतो. 
पुणे

पदपथ, रस्त्यात अतिक्रमणे

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पिंपरीतील संत तुकारामनगर परिसरात रस्ता आणि पदपथांवर खाद्यपदार्थ आणि विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून, पदपथावरील अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना ये-जा करणे अवघड झाले आहे.

संत तुकारामनगर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ महेशनगर चौपाटी आहे. येथे खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत. चौपाटीवर येणारे ग्राहक रस्त्यावर आडव्यातिडव्या स्वरूपात वाहने लावतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो. तसेच, या चौपाटीजवळून एचए मैदानाच्या विरुद्ध बाजूला असलेल्या पदपथावरही विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे येथील पदपथावरून पादचाऱ्यांना चालणे मुश्‍कील होते. अग्निशमन केंद्रासमोर व्यापार संकुलाजवळील पदपथावरही खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. येथेही रस्त्यावर वाहने लावली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. 

महापालिकेचे यशवंतराव चव्हाण रुग्णालय, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय यांच्यासमोरील बाजूस असलेल्या रस्ता व पदपथावर टपऱ्या, हातगाडीचालक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे येथून वाहनचालक, पादचारी यांना ये-जा करण्यात अडथळा जाणवतो.

विनापरवाना हातगाडी आणि टपऱ्यांवर महापालिकेतर्फे अतिक्रमण कारवाई केली जाते. त्याअंतर्गत संत तुकारामनगर परिसरातही कारवाई केली जाते. येथील पदपथावर आणि रस्त्यावर झालेली अतिक्रमणे हटविण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येईल. 
- सतीश इंगळे, कार्यकारी अभियंता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Price Hike : दूध महागणार! १ सप्टेंबरपासून प्रतिलिटर ९ रुपयांची वाढ; नवा दर किती?

Devdutta Padikkal Tattoo: बाबो! जर्सीचा नंबर अन् नाव थेट पाठीवर! पडिक्कलच्या टॅटू पाहून चाहतेही चक्रावले, म्हणाले, ‘ अरे हे काय!’

Animal Feed Poisoning: पशुखाद्यातून विषबाधा; गोणेवाडीत दोन जनावरे दगावली, दोन गंभीर; पशुपालकाला मोठा आर्थिक फटका

Marathi News Live Updates : रक्षाबंधनानिमित्त रामदास आठवलेंची कामाठीपुराला भेट; महिलांनी बांधली राखी

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात माणुसकीला लाज आणणारी घटना! मृत महिलेच्या कानातील सोन्याचे दागिने चोरले; VIDEO VIRAL होताच संतापाची लाट

SCROLL FOR NEXT