व्यापारी लूट प्रकरणातील चार आरोपींना अटक sakal
पुणे

व्यापारी लूट प्रकरणातील चार आरोपींना अटक

दौंड पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह एकूण चार आरोपींना अटक केली आहे

प्रफुल्ल भंडारी

दौंड : दौंड शहरातील किराणा मालाचे ठोक व्यापारी भक्तु नेवदमल सुखेजा यांच्याकडील १९ लाख ६४ हजार रूपयांच्या लूट प्रकरणात दौंड पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह एकूण चार आरोपींना अटक केली आहे. अटकेतील संशयित आरोपींकडून लुटीच्या रकमेपैकी एकूण ६ लाख ५२ हजार रूपये जप्त करण्यात आले आहेत. दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद घुगे यांनी या बाबत माहिती दिली. ६ डिसेंबर रोजी भक्तू नेवदमल सुखेजा (वय ६५) हे दुकानातून पायी घराकडे जात असताना पाच तरूणांनी त्यांच्याकडील रोकडची पिशवी हिसकावून त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली होती. या प्रकरणी पोलिसांनी कमल उर्फ कोमल बाबू हिरमटकर (वय २८ , रा. गांधीनगर, देहूरोड, सध्या रा. गोवा गल्ली, दौंड), प्रदीप उर्फ गणेश महेश कोळी (वय १९, रा. तेलगु कॅालनी, संभाजीनगर, दौंड), आकाश आरमुगम पिल्ले (वय ३१, रा. देहूरोड, जि. पुणे) व एका अल्पवयीन मुलास पोलिसांनी देहूरोड येथून ताब्यात घेतले आहे. टोळीतील एक संशयित आरोपी फरार आहे.

भक्तू सुखेजा यांच्या दुकानाशेजारील रिक्षांमध्ये बसून टोळीने त्यांच्यावर पाळत ठेवून ही लूट केली. देहूरोड येथील आरोपी रेल्वेने आले होते व लूट केल्यानंतर रेल्वे लोकोशेड परिसरातील काटवनात लपून बसले होते. त्यानंतर त्यांनी एका खासगी वाहनाने पुणे गाठले. लुटीच्या पैशातून त्यांनी पुण्यात कपडे खरेदी करून बुधवार पेठेतील एका वेश्यालयात वेश्यागमन केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

पुणे ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक राहुल धस, निरीक्षक विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकातील सहायक निरीक्षक ऋषीकेश अधिकारी, तुकाराम राठोड, फौजदार शहाजी गोसावी, महेश आबनावे, भगवान पालवे, सुशील लोंढे, सहायक फौजदार दिलीप भाकरे, पोपट जाधव, महेंद्र गायकवाड, हवालदार सुभाष राऊत, पांडुरंग थोरात, पोलिस नाईक अमोल गवळी, रणजित निकम, विशाल जावळे, अमिर शेख, सचिन बोराडे, अण्णासाहेब देशमुख, नारायण वलेकर, कॅान्स्टेबल अमोल देवकाते, सागर गायकवाड, गिरमे यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मदत केली.

दौंड न्यायालयाने अटकेतील तीन आरोपींना १३ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. संशयित आरोपी कोमल हिरमटकर हा तडीपार गुन्हेगार असून तो दौंड शहरात नातेवाईकाकडे आश्रयास होता तर आकाश पिल्ले याच्यावर देखील गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT