murder mystery crime in Nagar district challenge to police finding uniqueness in murder crime case marathi news Sakal
पुणे

Pune Crime : १८ लाखांचे पाच कोटी रुपये करून देण्याचे अमीष दाखविणाऱ्या भोंदू बाबासह साथीदारांवर हडपसरमध्ये गुन्हा दाखल

फिर्यादीने दिलेल्या तक्रारी नुसार, एका मध्यस्थीने फिर्यादीला अठरा लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले.

कृष्णकांत कोबल

हडपसर : अठरा लाखांचे पाच कोटी रूपये करून पैशांचा पाऊस पाडतो, असे सांगणाऱ्या भोंदू बाबासह चार जणांवर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ससाणेनगर काळेपडळ रस्त्यावर एक महिन्यापूर्वी ही घटना घडली होती. विनोद छोटेलाल परदेशी ( वय ४० रा. हडपसर ) यांनी त्याबाबत फिर्याद दिली आहे.

संशयित भोंदूबाबा आयरा शाब, माधुरी मोरे , रॉकी वैद्य (सर्व रा. बदलापूर, ठाणे), किशोर पांडागळे ( रा. उत्तमनगर, वारजे माळवाडी, पुणे ) या चार जणांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारी नुसार, एका मध्यस्थीने फिर्यादीला अठरा लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले. बाबा त्याचे ५ कोटी रुपये करून देतील, असेही त्याने सांगितले. त्यानुसार पैशाच्या अमिषा पोटी तब्बल १८ लाख रुपये बँकेतून काढून फिर्यादीने महाराजांसमोर ठेवले.

महाराज लिंबू हातात घेऊन विधी करत होता. दरम्यान, अचानक त्याठिकाणी पोलीसांसह चार-पाच इसम आले. ते १८ लाख रुपये घेऊन निघून गेले.

काही वेळातच आलेले पोलिस बनावट असल्याचे समजले. त्यावेळी फिर्यादीने आरडाओरडा केला मात्र, त्या ठिकाणी जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरल्यामुळे फिर्यादीने आता १८ लाख रुपयांची फसवून झाल्या प्रकरणी ढोंगी बाबा व त्यांचे साथीदारांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

हडपसर पोलिसांनी पैशाचा पाऊस पाडून १८ लाख रुपयांचे पाच कोटी रुपये करतो, असे सांगणाऱ्या संबधित बाबासह रोकड लंपास करणाऱ्या त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मनसे नेते अविनाश जाधव यांची सुटका, आंदोलनात घेतला सहभाग

MNS Mira bhayandar Morcha: मराठी मोर्चाला पोलिसांचा अडथळा? गुजराती-मारवाडींची चिथावणी; मीरा-भाईंदरमध्ये काय घडलं?

निशिकांत दुबेंच्या विधानावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले मंत्री प्रताप सरनाईक?

Viral Video : पुढील कसोटीसाठी येण्याची तसदी घेऊ नकोस! Dinesh Karthik ने सर्वांसमोर रवी शास्त्रींची केली पोलखोल

अखेर अस्मिताला समजणार प्रियाचा खरा चेहरा; भावजयीवर चांगलीच भडकली , वाचा 'ठरलं तर मग' मध्ये पुढे काय होणार?

SCROLL FOR NEXT