Fraud sakal
पुणे

Fraud News : वीस लाखांचे पाच कोटी रुपये करून देण्याचे आमिष; भोंदूबाबासह साथीदार पैसे घेऊन पसार

जादूटोणा करून वीस लाख रुपयांचे पाच कोटी रुपये करून देण्याच्या आमिषाने एका महिलेसह तिघांची भोंदूबाबा आणि त्याच्या साथीदारांनी २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - जादूटोणा करून वीस लाख रुपयांचे पाच कोटी रुपये करून देण्याच्या आमिषाने एका महिलेसह तिघांची भोंदूबाबा आणि त्याच्या साथीदारांनी २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भोंदूसह साथीदारांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आनंदस्वामी, तन्वीर श्यामकांत पाटील, शिवम गुरुजी आणि सुनील राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला नारायण पेठेत राहायला आहे. महिलेचे व्यावसायिक भागीदार असलेल्या एका व्यावसायिकाची तन्वीर पाटील याच्याशी ओळख झाली होती.

पाटीलने शिवम गुरुजी, सुनील राठोड, आनंद स्वामी यांच्याशी व्यावसायिकाची ओळख करून दिली. आरोपींनी व्यावसायिक, त्यांच्या ओळखीचे आणखी एक व्यावसायिक आणि तक्रारदार महिला अशा तिघांना वीस लाख रुपयांचे पाच कोटी रुपये करून देतो, असे आमिष दाखविले.

टाकीत टाकलेले पैसे घेऊन आरोपी पसार -

१३ सप्टेंबर रोजी आरोपी हे महिलेच्या घरी आले. आरोपींनी त्यांना रिकाम्या टाकीत २० लाख रुपये टाकण्यास सांगितले. त्यानुसार सर्वांनी एका टाकीत २० लाख रुपये टाकले. त्यानंतर आरोपींनी खोलीत धूर केला. हरिद्वार येथे जाऊन विधी करावा लागेल, असे आरोपींनी त्यावेळी सांगितले व पैसे घेऊन गेले.

महिलेने आरोपींशी संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला. मात्र आरोपींनी प्रतिसाद दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Duleep Trophy 2026: हा, मुलगा कमाल आहे! वैभव सूर्यवंशीच्या सांगण्यावरून DRS घेतला अन् सामन्यात ट्विस्ट आला Video Viral

मुलांना शाळेत जायला चीनने बांधली ९०० फूट उंच लिफ्ट, आता पर्यटकांची होते गर्दी; विद्यार्थ्यांचा ३ तासांचा प्रवास काही मिनिटात

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Uttar Pradesh: अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात ५० टक्के वाढ! दीड लाखांहून अधिक महिलांना योगी सरकारचे गिफ्ट

SCROLL FOR NEXT