Crime sakal
पुणे

Pune Crime : जादूटोणा करून अडीच कोटी रुपयांची फसवणूक; दोघांना अटक

जादूटोणा करून एका व्यावसायिकाची सुमारे अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोघांना कॅम्प परिसरातून अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - जादूटोणा करून एका व्यावसायिकाची सुमारे अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोघांना कॅम्प परिसरातून अटक केली. न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

अब्दुल हुसैन हसनअली नईमाआबादी आणि सीमा अब्दुल हुसेन नईमाआबादी (रा. लष्कर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. सीमा नईमाआबादी हिचा जामीन अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर ते दोघेजण पसार झाले होते.

याबाबत शेख अब्दुल बासित अब्दुल लतीफ (रा. कोंढवा खुर्द) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून नादीर अब्दुल हुसैन हसनअली नईमाआबादी (वय-४०), सीमा नादीर नईमाआबादी (वय-३५, दोघे रा. कॅम्प,पुणे), शोएब मैनुद्दीन अत्तार (वय-३५, रा. बोपोडी), माजीद उस्मान अत्तार (वय-५०, रा. बोपोडी), खालिद मैनुद्दीन अत्तार (वय-४०, रा. बोपोडी) आणि इरम शोएब अत्तार (वय-३२, रा. बोपोडी) या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शोएब आणि नादीर यांनी फिर्यादीला आयात-निर्यातीच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. शेख यांनी विश्वास ठेवून वेळोवेळी आरोपींच्या बँक खात्यात रक्कम जमा केली. परंतु परतावा मिळत नसल्यामुळे त्यांनी आरोपींकडे पैशांची मागणी केली. त्यावर शोएबने जादूटोणा करून फिर्यादीला गुंगीकारक पाणी पिण्यास दिले. ताविज बनवून देण्यासाठी पैसे घेतल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

त्याच्याविरुद्ध फसवणूक आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक सौरभ थोरवे, पोलिस अंमलदार हेमंत पेरणे यांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा ठावठिकाणा शोधून त्यांना अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT