‘सारथी’च्या कृषी, कृषिपूरक
प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा
सहव्यवस्थापकीय संचालक अजय पवार यांचे आवाहन
ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर ः राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा या गटांतील शेतकरी, युवक-युवती आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्यामार्फत विविध कृषी व कृषिपूरक प्रशिक्षण उपक्रमांचे विनामूल्य आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी या प्रशिक्षणांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सारथी उपकेंद्राचे सहव्यवस्थापकीय संचालक तथा अपर जिल्हाधिकारी अजय पवार यांनी केले आहे.
या प्रशिक्षण उपक्रमांमध्ये ड्रोन पायलट प्रशिक्षण, मधुमक्षिकापालन, कृत्रिम रेतन व मुरघास निर्मिती, कृषी विज्ञान केंद्रामार्फत अल्प मुदतीचे कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण तसेच शेतकरी उत्पादक कंपनीतील सभासद आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षणाचा समावेश आहे.
शेतकरी उत्पादक कंपनी क्षमता बांधणी प्रशिक्षणासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर आहे. अर्ज केल्यानंतर आवश्यक कागदपत्रांच्या हार्ड कॉपी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे कार्यालयास पाठविण्याची अंतिम तारीख १० ऑक्टोबर आहे.
ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२६ आहे. ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर १५ दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रांच्या ‘हार्ड कॉपी’ सारथीच्या संबंधित विभागीय कार्यालयास पाठवाव्यात. मधुमक्षिकापालन तसेच कृत्रिम रेतन व मुरघास निर्मिती प्रशिक्षणासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर आहे. या प्रशिक्षणांसाठी आवश्यक कागदपत्रांच्या हार्ड कॉपी १० नोव्हेंबरपर्यंत सारथीच्या संबंधित विभागीय कार्यालयास पाठवाव्यात.
या प्रशिक्षणांमुळे आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे ज्ञान, कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होण्यास तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. कृषी क्षेत्र अधिक सक्षम, स्पर्धात्मक आणि शाश्वत करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणांचा पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.