पुणे

सातारा चारा बियाणे आता १०० टक्के अनुदानावर

CD

सातारा जिल्ह्यात मोफत चारा बियाणे

दुष्काळग्रस्त तालुक्यांत मिळणार लाभ

ॲग्रोवन वृत्तसेवा
सातारा : ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता’ योजनेच्या नियमांत मोठी शिथिलता आणत शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्यांतील वैयक्तिक शेतकरी आणि शेतकरी गटांना १०० टक्के अनुदानावर चारा बियाणे उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली आहे.

२०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी लागू या सुधारित तरतुदींनुसार, वैयक्तिक शेतकऱ्यांना एका हेक्टरसाठी १०० टक्के अनुदानावर ४००० रुपये किमतीचे चारा बियाणे दिले जाणार आहे. शेतकरी गटांना पाच हेक्टरसाठी २० हजार रुपयांपर्यंतचे चारा बियाणे विनामूल्य उपलब्ध होईल.

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयानुसार जिल्ह्यात ११ हजार ७१५ एकर क्षेत्रावर चारा लागवडीचे उद्दिष्ट आहे. त्यातून सुमारे २.७५ लाख मेट्रिक टन हिरवा चारा उत्पादित होण्याचा अंदाज आहे. या नियोजनासाठी एकूण १ लाख २८ हजार २६५ किलो बियाणे वितरित केले जाणार आहे. यात संकरित मका ५० हजार किलो, संकरित बाजरी ७ हजार २९९ किलो, संकरित ज्वारी १० हजार ७३० किलो, चारा मका ३१ हजार २५६ किलो आणि संकरित चारा मक्याचे २८ हजार ९८० किलो बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. सोबतच अतिरिक्त चारा बियाणे व ठोंब्यांचे वाटपही करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd T20: ६ चेंडूंत ११ धावा, शेवटच्या चेंडूपर्यंत थरार! तिलक-नितीशने पलटवला सामना, भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय!

Pune News : औषधाच्या गोळीतून ब्लेडचे तुकडे खायला दिले; पतीस सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, पत्नी फितूर होऊनही वैद्यकीय पुराव्यांवर निकाल

Piyush Goyal : पावभाजीची चव रोबोट देऊ शकणार नाही; वैभव सूर्यवंशीसारखा सिक्सरही नाही! कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मर्यादा आणि भारतातील संशोधनाच्या संधींवर पियुष गोयल यांची मांडणी

Share Market: ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंला SEBIचा दणका! 546 कोटी परत करण्याचे आदेश, 67 कोटी व्याज अन् 11.5 कोटींचा दंडही भरावा लागणार

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी उद्या वाराणसी दौऱ्यावर; कसा असेल कार्यक्रम?

SCROLL FOR NEXT