पुणे

संवाद

CD

संवाद- (पान ३ ला जुने टेम्पलेट घेऊ नका. नवीन घ्या.)
-----------
वसुली २.०!
-----------
‘सातवी-अ’च्या वर्गात रंजू-संजूची मैत्री नावाजली जायची. पण संजयची एकच गोष्ट मात्र रंजनला खूप खटकायची; ती म्हणजे संजयचा ‘हिशेब’.
-----------
रंजन एक समंजस मुलगा होता. तो गणितात हुशार होताच, पण पैशांचा हिशेब लिहून ठेवायची चांगली सवय त्याला होती. आई-बाबांनी त्याला सांगितलं होते, ‘‘रंजू, हिशेब लिहून ठेवला म्हणजे आपण किती पैसे खर्च केले ते आपल्याला समजतं आणि कुणाचे पैसे द्यायचे राहिले तर पण ते वेळेवर देतो.’’
आई जेव्हा त्याला मिरची-कोथिंबीर आणायला कोपऱ्यावर जायला सांगायची तेव्हा आईकडून किती पैसे घेतले, किती खर्च झाले आणि किती उरले याचा हिशेब तो आईला दाखवायचा. ‘रमेशला शाळा सुटल्यावर लेज् घेण्यासाठी १० रुपये उसने दिले’ किंवा ‘आज समीरच्या कुल्फीचे २० रुपये मी दिले’ असे हिशेबही वहीत लिहून ठेवायचा. उसने घेतलेले पैसे रमेश किंवा समीर अर्थातच परत द्यायचे. त्यांनी दिले नाहीत, तर रंजन त्यांना आठवण करून द्यायचा- ‘‘सम्या, माझे २० रुपये आहेत हां तुझ्याकडे. तुला पॉकेटमनी मिळाल्यावर प्लीज मला परत दे!’’ वर्गातल्या बहुतेक मुलांची पॉकेटमनीच्या हिशेबाची पद्धत अशीच होती. संजयचा हिशेब मात्र जरा वेगळा होता.

संजूचा ‘हिशेब’

संजय असं दाखवायचा की आपल्याला पैशांची काहीच पर्वा नाहीये. कुणी दुसऱ्याकडून उसने घेतलेले ५ रुपये परत देऊ लागला, की तो म्हणायचा, ‘‘शी यार! ५ रुपयांचा पण हिशेब करता तुम्ही?... काय ‘चिंधीपणा’!’’ आता हे वाचून तुम्हाला वाटू शकेल, की ‘संजय कित्ती उदार मुलगा आहे... पॉकेटमनीतून मित्रांवर पैसे खर्च करायला तो तयार असतो...’ साफ चूक!
एकदा रंजन आणि संजय सायकलवरून शिकवणीला चालले होते. सायकलच्या चाकांत हवा भरण्यासाठी ते थांबले, पण रंजनच्या लक्षात आलं की त्या दिवशी त्याच्याजवळ पैसे नाहीयेत. संजयने पैसे दिले. दुसऱ्या दिवशी जेव्हा रंजन पैसे परत करू लागला, तेव्हा संजयने ‘डायलॉग’ मारला- ‘‘पाच रुपये परत करणार का तू भावा?!’’ रंजन गप्प बसला.
नंतरच्या दिवशी दोघं शाळेतून घरी निघाले, तेव्हा वाटेत खारे दाणे खायचं ठरलं. रंजनने स्वत:साठी ५ रुपयांचे खारे दाणे घेतले, तेव्हा लगेच संजू म्हणाला, ‘‘माझ्यासाठी पण घे रे. आज तुझ्याकडून मला ट्रीट!’’ रंजनने संजयसाठी खारे दाणे घेतले खरे, पण संजयचं हे वागणं त्याला आवडलं नाही. म्हणजे पहा- आधीच्या दिवशी जेव्हा रंजन पैसे परत देत होता, तेव्हा त्याने ते नाकारले आणि दुसऱ्या ठिकाणी रंजनला आपल्यासाठी खर्च करायला लावलं. फिट्टंफाट! रंजन मनात म्हणाला, ‘‘बरोबर वसुली केली याने ५ रुपयांची. मग काल का नको-नको म्हणत होता!’’

आईचं मत

हा प्रकार एकदाच नाही, अनेकदा घडला. एकदा संजयने रंजनला आपल्या सायकलीवर लिफ्ट दिली होती. रंजन ‘थँक्स’ म्हणू लागला, तेव्हा संजय म्हणाला, ‘‘बास का! मैत्रीत थँक्स?...’’ अगदी दुसऱ्याच दिवशी संजयने रंजनचं नवं खोडरबर- ‘ए, मला आवडलं!’ म्हणत स्वत:कडेच ठेवून घेतलं. जणू आदल्या दिवशी केलेल्या उपकाराची वसुली. मग मात्र रंजनला राग आला. त्यानं आईला हा सगळा प्रकार सांगितला.
तो म्हणाला, ‘‘आई, हे वागणं बघ ना- म्हणजे तोंडावर दाखवायचं की आपण किती उदार आहोत, आपल्याला हिशेबाचं काही पडलेलं नाही... आणि त्याच वेळी दुसऱ्या कोणत्या तरी मार्गाने पैसे वसूल करून घ्यायचे! ही म्हणजे वसुली २.० आहे की नाही?...’’
रंजनने दिलेली ‘वसुली २.०’ची उपमा आईला मजेशीर वाटली. तिनं रंजनला सांगितलं, ‘‘तू हे संजयला स्पष्ट सांग. लॉजिकली पटवून दे. तो कदाचित हे मुद्दाम करत नसेल... आपलं वागणं चुकतंय हे त्याच्या लक्षात येत नसेल. तू हे सांगितल्यावर तो तुझ्यावर चिडेलसुद्धा. पण स्वत:च्या वागण्याबद्दल विचार नक्की करेल.’’
आता रंजन संजयशी बोलणार आहे. तुम्हाला काय वाटतं?... संजय विचार करेल की रंजनवर चिडेल?...

-------------
मैत्रीबद्दलचे ‘Just Kidding’ हे Trudy Ludwig यांचे पुस्तक तुम्ही जरूर वाचा.
--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

POCSO Case: अल्पवयीन विद्यार्थिनीचा हात पकडून लगट करण्याचा प्रयत्न, थेऊरमधील तरुणावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा

Nasarapur Crime : नसरापूर अत्याचार व खून प्रकरणाची आजपासून विशेष न्यायालयात सुनावणी; जलदगती न्यायालयात खटला चालणार

पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्यासोबत अर्धा तास दिलखुलास गप्पा; १९९१ची पुणे विमानतळावरील अविस्मरणीय पत्रकार भेट

Latest Marathi News Live Update : दिल्लीत २०२६ मधील विजेच्या मागणीचा उच्चांक नोंदवला गेला

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! दूध आणि भाज्यांवरुन ठरणार नवा पगार? 3490 कॅलरी फॉर्म्युला नेमका आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT