MP Adhalrao Patil sakal
पुणे

Pune News : माणिकडोह धरणातून बंदिस्त जलवाहिनीतून जुन्नरला पाणी पुरवठा योजनेस निधी मंजूर; आढळराव पाटील

माजी खासदार आढळराव पाटील यांची माहिती

दत्ता म्हसकर

जुन्नर : () जुन्नर नगर पालिकेच्या सुधारित पाणी योजनेसाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून २० कोटी ७९ लाख रकमेच्या निधीस मंजुरी मिळाली असल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.

माजी खासदार आढळराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे माणिकडोह धरणातून बंदिस्त जलवाहिनीतून जुन्नर शहरात आणण्याच्या योजनेसाठी फेब्रुवारी २०२२ मध्ये १५ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.

दरम्यान सुधारित दरसूची व वाढलेला जीएसटी यामुळे या कामास नव्याने तांत्रिक मान्यता घेण्यात येऊन केंद्र पुरस्कृत अमृत २.० योजनेत या कामाचा समावेश व्हावा यासाठी राज्याचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली नोव्हेंबर २०२२ मध्ये संपन्न झालेल्या राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या बैठकीत प्रस्तावाची छाननी करण्यात आली होती. त्यानंतर शासन मान्यतेसाठी या कामाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

याबाबत माहिती देताना आढळराव पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असणाऱ्या शहरातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून राज्य शासनाकडे पाठपुरावा करत आलो.

त्यास यश येऊन या महत्त्वकांक्षी योजनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास बाब म्हणून मंजुरी देऊन निधी उपलब्ध केला आहे. विशेष म्हणजे माणिकडोह धरणातून सुमारे सात-आठ किलोमीटर लांबीची थेट पाईप लाईन घेण्यात येऊन त्याद्वारे शाश्वत पाणीपुरवठा स्त्रोत शहराला उपलब्ध होणार आहे.

त्यामुळे पाणी गळती न होता पाण्याचा अपव्यय टळून बारमाही पाणी शहरातील नागरिकांना मिळणार आहे. ही योजना मार्गी लावल्याबद्दल महायुती सरकारचे माजी खासदार आढळराव पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT