artificial intelligence sakal
पुणे

Achyut Godbole : तंत्रज्ञानामुळे भविष्यात नोकऱ्या जाण्याचे संकट

‘तंत्रज्ञानामुळे मागील दहा ते पंधरा वर्षांत मनुष्याने केलेला विकास हा आजवरचा सर्वोच्च विकास ठरला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘तंत्रज्ञानामुळे मागील दहा ते पंधरा वर्षांत मनुष्याने केलेला विकास हा आजवरचा सर्वोच्च विकास ठरला आहे. पण कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या सुमारे ७० ते ८० टक्के नोकऱ्या भविष्यात नाहीशा होतील’’, अशी भीती लेखक अच्युत गोडबोले यांनी शनिवारी (ता. १८) व्यक्त केली.

आशय लिटररी एजन्सी निर्मित आणि कृष्णा पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित ‘फ्युचरटेक’ आणि ‘भन्नाट शोध’ या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. ‘फ्युचरटेक’ या पुस्तकाचे लेखन गोडबोले आणि आसावरी निफाडकर यांनी, तर ‘भन्नाट शोध’ या पुस्तकाचे लेखन गोडबोले आणि अमृता देशपांडे यांनी केले आहे.

याप्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ, सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल पवार, ज्येष्ठ अनुवादक रवींद्र गुर्जर, आसावरी निफाडकर, अमृता देशपांडे आदी उपस्थित होते.

प्रा. जोशी म्हणाले, ‘फ्युचरटेक’ आणि ‘भन्नाट शोध’ ही प्रत्येक विद्यार्थ्याने आणि शिक्षकाने वाचलीच पाहिजेत अशी पुस्तके आहेत. दुर्दैवाने आपल्या शिक्षणव्यवस्थेत आज ठरावीक पठडीतून विद्यार्थ्यांच्या फौजा बाहेर पडत आहेत; पण त्यांच्यातील कुतूहल जागविण्याचे काम आज खूप कमी शिक्षक करत असल्याचे दिसते.’’

शिरसाठ म्हणाले, ‘साहित्य व्यवहारात बऱ्याचदा लेखकाचा तितकासा गौरव होत नाही. प्रकाशक किंवा संपादकाच्या वाट्यालाच अधिक सन्मान येतो; पण अच्युत गोडबोले मात्र याला अपवाद आहेत. रंजक भाषा, सुबोध शैली आणि ज्ञानप्रद माहिती यामुळे गोडबोलेंच्या लेखनाचे मराठी वाचक नेहमीच मोठ्या प्रमाणात स्वागत करतात.’’ या वेळी ग्रंथविक्रीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल निखिल दाते यांचा, गोडबोले यांच्या साहित्यावर संशोधन करणाऱ्या डॉ. तनुजा मुळे यांचा आणि ‘फ्युचरटेक’ या ग्रंथासाठी साह्य करणारे गडचिरोली येथील अधिकारी अभिजित वावरे यांचा सन्मान करण्यात आला. यशश्री पुणेकर यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bar Association Election : महाराष्ट्र व गोवा वकील परिषद निवडणुकीत पुण्याचा दबदबा; २३ पैकी तब्बल आठ उमेदवार विजयी

US Iran Conflict: अमेरिका-इराणचं पुन्हा पेटलं! यूएसच्या तळांवर इराणने डागले क्षेपणास्त्र; दोन्ही देशांमधला युद्धविराम धोक्यात

Karad Crime : वैवाहिक वादातून पत्नीने भावाच्या मदतीने अभियंता पतीला कट रचून संपविले

Kuno Viral animal : दशकांनंतर कूनोच्या जंगलात दिसला रहस्यमयी 'प्राणी! कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाली पहिली झलक, मुख्यमंत्र्यांनी शेअर केले photo

मोदी सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला; यशोमती ठाकूरांचा हल्लाबोल, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अमरावतीत मशाली पेटल्या

SCROLL FOR NEXT